नाशिक : येथील लासलगाव एसटी बसस्थानकावर (Lasalgaon ST bus station) एका महिलेला भरदिवसा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिलेच्या अंगावर पेट्रोल (Petrol) ओतून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत महिला ४० टक्के भाजली असून तिला अधिक उपचारासाठी नाशिक (Nashik hospital) येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray ) यांनी पीडितेची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांना धीर दिला. दरम्यान, पीडित महिलेच्या (victim) जबाब घेतला असून त्यानुसार तिघांपैकी दोघांना ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी अजून मिळालेला नाही, अशी माहिती पोलीस अधीक्षक आरती सिंह यांनी दिली.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जाळण्यात आलेल्या महिलेची भेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी मुलांची चिंता व्यक्त केली. त्यांना सांगितले आहे, मुलांची चिंता करू नका, त्यांना धीर दिला आहे. मी डॉक्टरांशी बोललो आहो. डॉक्टर त्यांचं काम करत आहेत. त्यांना वाचविणे गरजेचे आहे, त्याबाबत प्रयत्न सुरू आहे. अशा घटना घडत आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे हे खरं आहे पण आत्ता त्यांना वाचविणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री म्ह्णालेत.


पेट्रोल बाटलीत मिळणे ही नवीन घटनासमोर आली आहे. पेट्रोल असं विकणे हा अपराध आहे. असं कुठे विकलं जात असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे. आत्ता सध्या उपचार महत्वाचे आहे, बाकी सगळं व्यवस्थित होईल, असे मुख्यमंत्री म्हणालेत.


तिघांपैकी दोघे ताब्यात - पोलीस अधीक्षक



पोलीस अधीक्षक आरती सिंह, यांनी सांगितले महिलेच्या जबाबानुसार तिघांपैकी दोघांना ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी सापडलेला नाही. दरम्यान, महिलेने आपल्या गाडीतून पेट्रोल बाहेर काढले होते. तर मुख्य आरोपीने पीडित महिलेशी २२ जानेवारीला लग्न केले होते. ते तिच्या घरच्यांना मान्य नसल्याची माहिती आहे. 


तसेच महिलेने पेट्रोल पंपावर बाटलीत पेट्रोल घेतलं होते. मुख्य आरोपी ( महिलेचा नवरा ) आणि पीडित महिलेत वाद ही झाला होता. आग कुणी लावली याबाबत आत्ता माहिती सांगणे उचित नाही. मात्र जिल्ह्यात आता कुठेही बाटलीत पेट्रोल मिळणार नाही, याबाबत पेट्रोल पंप चालकांना सूचना कडक सूचना दिल्या जातील, अशा त्या म्हणाल्यात.