मुंबई: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी मुख्य़मंत्र्यांवर स्वपक्षातूनच दबाव वाढतो आहे. राठोड यांच्या राजीनाम्यासाठी विदर्भातले शिवसैनिक एकवटणार आहेत. विदर्भातले शिवसेना लोकप्रतिनिधी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय राठोड यांमुळे पक्षाचं काम करणं कठीण जात असल्याची खंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर मांडणार आहेत. 1 मार्चपासून अधिवेशन सुरू होत आहे. राठोडामुळे अधिवेशनात गदारोळ होणार अशी चर्चा देखील सुरू आहे. मंत्रिमंडळ स्थापनेवेळीही काही खासदार, आमदार आणि जिल्हाप्रमुखांनी राठोड यांच्या मंत्रीपदाला विरोध केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पुन्हा राठोड यांच्या विरोधात पत्र देण्याची शक्यता आहे. 


संजय राठोड यांची राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी गच्छंती अटळ असल्याचं दिसून येतं आहे. मी निर्णय घेण्याआधी तू निर्णय घे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बजावल्याची माहिती मिळाली आहे. 


पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर भाजप नेतेही राठोड यांच्या राजीनाम्यावर आक्रमक झाले आहेत. राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा देण्यात विरोधीपक्ष भाजपने दिला आहे. तर भाजपपाठोपाठ शिवसेनेतही राठोडांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत चालला आहे. विदर्भातल्या कार्यकर्त्यांनी राजीनामा घेण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली. 


राज्यातील सर्वात मोठी बातमी पाहा व्हिडिओ