अहमदनगर : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज अहमदनगर दौऱ्यावर होते. त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने उड्डाणानंतर हेलिकॉप्टर तात्काळ खाली उतरवण्यात आले. त्यामुळे
उद्धव ठाकरे गाडीने मुंबईला रवाना झाले. उद्धव यांचे हेलिकॉप्टर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उतरविण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना नेते उद्धव ठाकरे हे नगर दौऱ्यावर होते. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची हत्या झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आले होते. त्यानंतर ते मुंबईकडे निघतांना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे त्यांचे हेलिकॉप्टर टेक ऑफ घेऊच शकले नाही. त्यामुळे उद्धव यांना परत उतरावे लागले. हेलिकॉप्टरमध्ये झालेला बिघाड तात्काळ दुरुस्त होऊ शकत नसल्याने त्यांना कारने मुंबईकडे रवाना करण्यात आले. 


उद्धव यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने उद्धव यांना पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर परत उतरावे लागले. त्यांच्या समवेत शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री दीपक केसरकर, पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि भाऊ कोरेगावरकर हे देखील होते. हे सर्वजण कारने मुंबईकडे रवाना झाले आहेत.