UGC Job Opportunity: यूजीसी अंतर्गत यंग प्रोफेशनल आणि संचालक ही पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 60 ते 70 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. यंग प्रोफेशनल पदासाठी उमेदवारांना 11 ऑगस्ट तर संचालक पदासाठी उमेदवारांना 28 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

UGC Recruitment: चांगले पद आणि पगाराची नोकरी शोधत असलेल्यांसाठी महत्वाची बातमी आहे. विद्यापीठ अनुदान आयोगामध्ये विविध पदांची भरती केली जाणार असून येथे नोकरी करण्याची संधी चालून आली आहेत.  यामध्ये यंग प्रोफेशनल आणि डायरेक्टर अशी पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. 


यूजीसी अंतर्गत यंग प्रोफेशनल (आयोगातील विविध कामे) ची 5 पदे, यंग प्रोफेशनल (सोशल मीडिया विशेषज्ञ) चे 1 आणि यंग प्रोफेशनल (कायदा) चे 1 पद भरले जाणार आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 60 ते 70 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. 11 ऑगस्ट 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.


यासोबतच डायरेक्टर फॉर इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोनॉमी अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रो फिजिक्स (IUCAA) हे पद भरले जाणार आहे. IUCAA  संचालक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे दहा वर्षांचा एक प्रख्यात शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक किंवा समतुल्य श्रेणीतील अनुभव असावा.  त्यासाठी नियुक्तीचा कालावधी पाच वर्षांसाठी किंवा संचालक पूर्ण होईपर्यंत असेल याची उमेदवारांनी नोंद घ्या 


संचालक हा IUCAA चा कार्यकारी अधिकारी असेल आणि असेल योग्य प्रशासन आणि निधीच्या नियंत्रणाची त्यांच्याकडे जबाबदारी असेल.केंद्र संचालक हे केंद्राच्या सर्व कामकाजावर लक्ष ठेवतील. या पदासाठी उमेदवारांनी आपले अर्ज यूजीसीच्या अधिकृत वेबसाइटवर पाठवायचे आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज 28 ऑगस्टपर्यंत पाठवायचे आहेत. संचालक पदावर निवड झालेल्या उमेदवारास दरमहा 2 लाख 10 हजारपर्यंत पगार दिला जाणार आहे. 


पदभरतीचा तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा


भारतीय क्रीडा प्राधिकरणात भरती


भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये पदवी उत्तीर्णांना अर्ज करता येणार आहे. स्पोर्ट्स अथोरिटी ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आहे आहे. 


भारतीय क्रीडा प्राधिकरणात ज्युनिअर अ‍ॅडव्हायजर आणि यंग प्रोफेशनल ही पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या मुदतीच्या आत संस्थेकडे अर्ज पाठवू शकतात.


कनिष्ठ सल्लागारचे एक पद भरले जाणार असून यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून वित्त/लेखा/ वाणिज्य या विषयात पदव्युत्तर पदवी पूर्ण करणे आवश्यक आहे. किंवा वित्तीय व्यवस्थापन/लेखा/सीए/आयसीएमएमध्ये दोन वर्षांचा पीजी डिप्लोमा पूर्ण करणे गरजेचे आहे.