लंडन : कोरोना वायरसची वाढती प्रकरण समोर आल्यानंतर दुसऱ्या लाटेने देशाची चिंता वाढली आहे. ब्रिटनदेखील कोरोनाच्या साखळीत अडकलाय. आता परीस्थितीतून बाहेर पडण्यासाठी पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी दुसरा लॉकडाऊनचा निर्णय घेतलाय. कोरोना पॉझिटीव्हची वाढती आकडेवारी पाहता चार आठवडे म्हणजे एक महीना लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला गेलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता लॉकडाऊन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. वेळ असतानाच कडक पाऊले उचलली गेली नाहीत तर पहील्या लाटेपेक्षा लोकांचे अधिक मृत्यू होतील. त्यामुळे वेळेत कारवाई होणं गरजेचे असल्याचे पंतप्रधान बोरिस म्हणाले. 


तुम्हाला घरी राहायला हवं आणि अत्यंत महत्वाचे असेल तरच घराबाहेर पडावे. जर तुम्ही घरुन काम करु शकत नसाल तर तुमच्या घरच्यांची काळजी घ्या. स्वयंसेवक बनून गरजुंना मदत करा आणि अत्यावश्यक वस्तू पुरवा असे आवाहन पंतप्रधान बोरिस यांनी केले. या लॉकडाऊनमध्ये व्यवसाय, रोजगारामध्ये थोडी शिथिलता असेल. लवकरच कामगार सहायता योजना पुढे चालवण्याचे आश्वासन त्यांनी जनतेला दिले.



हॉटेल्स, बार बंद 


सरकारने अत्यावश्यक नसलेली दुकाने, बार, रेस्टॉरंट आणि पब सध्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. लोकांना केवळ एका व्यक्तीला ते देखील घराबाहेर भेटण्याची परवानगी असेल. शाळा, कॉलेज, विश्व विद्यालय उघडण्याची परवानगी देण्यात आलीय. ख्रिसमसमध्ये यामधून सूट मिळेल पण तो निर्णय परिस्थिती पाहून घेण्यात येईल असेही ते म्हणाले.