उल्हासनगरमध्ये दहावीचा समाजशास्त्राचा पेपर फुटला
उल्हासनगरमध्ये दहावीचा समाजशास्त्र विषयाचा इंग्रजी माध्यमाचा पेपर फुटला. वरप गावातील सिक्रेड हार्ट स्कूल, या शाळेच्या विद्यार्थ्याला त्याचा.
उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये दहावीचा समाजशास्त्र विषयाचा इंग्रजी माध्यमाचा पेपर फुटला. वरप गावातील सिक्रेड हार्ट स्कूल, या शाळेच्या विद्यार्थ्याला त्याचा पेपर 9.30 लाच त्याच्या वॉट्सअॅपवर मिळाला. त्यानं शाळेच्या प्रमुख अल्विन अॅनथोनी यांना सूचना दिली.
उल्हासनगरमध्ये तो फुटलेला पेपर ओरिजिनल
10.30 ला जेव्हा पेपर उघडण्यात आला तेव्हा तंतोतंत तोच पेपर असल्याचं समोर आलं. शाळेनं एसएससी बोर्डाला माहिती दिली. याबाबत तक्रार केली. उल्हासनगर शहरातील एका खाजगी शिक्षकेनं विद्यार्थ्याला हा पेपर पाठवला होता. याबाबतीत आता काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.