विनयभंग केल्याचा आरोप सिद्ध झाला, तर... जितेंद्र आव्हाड यांच्यावर कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल?
विनयभंगाच्या प्रकारावरुन संबंधित कलम पोलिसांकडून संशयीत आरोपीवर लावलं जातं. स्त्रियांचं विनयभंगापासून संरक्षण करण्याकरता या कलमांची तरतूद करण्यात आली होती. स्त्रियांच्या हितासाठी या कायद्याची निर्मिती करण्यात आली होती.
पराग ढोबळे, झी मीडिया, ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरुद्ध विनयभंगांचा गुन्हा दाखल झाला आहे. रीदा राशीद (Rida Rashid) नावाच्या महिलेने जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली. रीदा राशीद यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत आव्हाड यांच्यावर गंभीर आरोप केले. मात्र, त्या भाजपच्या कार्यकर्ता अथवा कोणत्या पदाधिकारी आहेत की नाही समजू शकलेले नाही. एखाद्या व्यक्तीवर झालेला विनयभंगा आरोप सिद्ध झाला, तर आरोपीला किती शिक्षा होते? यावर आता चर्चा होत आहे.
राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर आय पी सी 354 कलमाखाली विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंब्रा पोलिसांनी जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी आता पुढील कारवाई केली जाते आहे. महत्त्वाचं म्हणजे विनयभंग प्रकरणी फक्त 354च नव्हे तर अन्यही काही कलमांखाली गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. त्याचे काही प्रकराही भारतीय दंड संहितेत नमूद करण्यात आलेले आहेत.
विनयभंगाच्या प्रकारावरुन संबंधित कलम पोलिसांकडून लावलं जात
354 कलमाखाली जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विनयभंगाच्या प्रकारावरुन संबंधित कलम पोलिसांकडून संशयीत आरोपीवर लावलं जातं. स्त्रियांचं विनयभंगापासून संरक्षण करण्याकरता या कलमांची तरतूद करण्यात आली होती. स्त्रियांच्या हितासाठी या कायद्याची निर्मिती करण्यात आली होती.
कलम 354 चे स्वरुप आणि शिक्षा
एखाद्या स्त्रीला लाज वाटावी किंवा आक्षेपार्ह वाटावी अशा स्वरुपाची जबरदस्ती केल्यास कलम 354 अन्वये कारवाई केली जाऊ शकते. हा गुन्हा सिद्ध झाल्यास तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. शिवाय दंडही आकारला जाऊ शकतो. दुसऱ्यावेळी या गुन्ह्यात दोषी आढळल्यात शिक्षेत पाच वर्षांपर्यंत वाढही होऊ शकते.
यात 354 कलमा व्यतिरिक्त उप कलम अ - ब - क - ड यांची ही जोड आहे. शारीरिक जवळीक व नको असलेली व उघड उघड लैंगिक गोष्टींची मागणी करणारी मैत्री. स्त्रीला विवस्त्र करण्यास भाग पडण्याचा उद्धेशन कोणताही पुरुष तिच्यावर हल्ला करील तशी कृती करण्यास अपप्रवृत्त करणे, चोरून अश्लील चित्रीकरण करने, चोरून पाठलाग करणे अशा स्वरुपाच्या तक्रारी येतात.
विनयभंगाचा प्रकरण न्यायालयाबाहेर सोडवता येऊ शकत नाही
समाजात स्त्रियांशी नैतिक आणि सभ्य वर्तन प्रत्येकानं करावं आणि तसं वर्तन जर केलं जात नसेल, तर अशा विरोधाचत स्त्रियांना दाद मागता यावी, यासाठी कायद्याची मदत घेतली जाते. मात्र या कलमांचा दुरुपयोगही केला जाऊ शकते, अशी भीती अनेकदा व्यक्त करण्यात आली आहे. विनयभंगाचा आरोप एखाद्या व्यक्तीवर करत पोलीस तक्रार केली गेली तर हा गुन्हा सिद्धही करावा लागतो. विशेष म्हणजे विनयभंगाचा प्रकरण न्यायालयाबाहेर सोडवता येऊ शकत नाही. हा दखलपात्र आणि अजामीनपात्र स्वरुपाचा गुन्हा आहे.