सचिन कसबे झी मीडिया पंढरपूर: बऱ्याचदा प्राण्यांमध्ये एखाद्या पिल्लाची आई गेल्यावर दुसऱ्या प्राण्याची आई त्याचा सांभाळ करते असं दृश्यं पाहिलं असेल. मात्र सोशल मीडियावर चक्क चिमुकली आणि गाय यांच्यातील एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. गायीला आपल्याकडे आईसारखं मानलं जातं. याच गायीचा लळा एका चिमुकलीला लागला आहे. तिचा व्हिडीओ सोशल मीडियात चर्चेचा विषय बनला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सई तळेकर नावाची ही चिमुकली थेट गायीच्या आचळला तोंड लावून दूध पिते. गायही तिला अगदी आपल्या पिल्लासारखंच प्रेम देते. सोलापूर जिल्ह्यातल्या केम गावातल्या दोन वर्षांच्या सईला गायीचा खूपच लळा लागला आहे. वयाच्या आठव्या महिन्यापासून ती गायीचा आचळाला तोंड लावून दूध पिते. 



लहानपणी गायीसोबत खेळताखेळताच सईनं दूध पिण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गाईनं तिला कोणताच त्रास दिला नाही. तेव्हापासून तिच्यात आणि गायीमध्ये मायलेकीचं नातंच तयार झालंय. सईचा हा व्हिडीओ सोशल मीडियात चर्चेचा विषय बनला आहे.


लहान मुलांसाठी गाईचं दूध अतिशय पौष्टिक मानलं जातं. शिवाय आपल्याकडे गायीला मातेसमान मानलं जातं. हे नातं किती घट्ट आहे, याचीच साक्ष हा व्हिडिओ देत आहे.