प्रशांत शर्मा, झी २४ तास, शिर्डी : आता बातमी एका अनोख्या (unique Wedding) विवाहाची. शेतकऱ्याच्या मुलानं एका अनाथ मुलीशी लग्नगाठ बांधून एक वेगळंच उदाहरण घालून दिलंय. साईनगरी शिर्डीमध्ये (Shirdi) झालेल्या या लग्नाला आपणही जायलाच हवं. साईनगरी शिर्डीतल्या साईआश्रय अनाथाश्रमातला हा जल्लोष. निमित्त होतं ते या आश्रमातल्या तरुणी चि सौ कां महेश्वरी दळवी हिच्या लग्नाचं. योगेश आहेर या होतकरू शेतकरी तरुणाशी तिचा विवाह झाला. (unique Wedding in sainagar shirdi orphan girl maheshwari dalvi marriage with farmer yogesh aher) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

योगेशची बऱ्यापैकी शेती आहे. जनावरं आहेत. पण शेतकरी नवरा नको अन् खेड्यात राहायचं नाही या कारणानं त्याला मुलगीच मिळेना. अखेर शिर्डीत राहणारे मेहुणे सचिन तांबे यांच्या माध्यमातून साईआश्रयला त्यानं संपर्क केला. साईआश्रयच्या गणेश दळवींनी 16 व्या वर्षापासून सांभाळ केलेली महेश्वरी योगेशला आवडली अन् मग रंगला हा अनोखा सोहळा.



महेश्वरी मुळची मुंबईची. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर कधी या तर कधी त्या नातलगाकडे राहिली. मात्र चर्मरोग झाल्यामुळे सर्वांनीच तिला नाकारली. अखेर साईचरणी नक्की आसरा मिळेल म्हणून ती शिर्डीत आली. तिचा सांभळ करणाऱ्या गणेश दळवींनी महेश्वरीचं साश्रू नयनांनी कन्यादान केलं. लहानपणी नाकारल्या गेलेल्या पण नंतर दीडशे लोकांच्या परिवारात वाढलेल्या महेश्वरीचा कंठ या भव्य सोहळ्यानं दाटून आला नसता तरच नवल.


शेतकऱ्याचा पोरगा असलेल्या योगेशनं मनाची श्रीमंती काय असते हे दाखवून दिलंय. त्याच वेळी शेतकरी आहे म्हणून लग्नाला नकार देणा-या प्रत्येक उपवर मुलींना खणखणीत चपराकही दिलीये.