पालघर : पालघर विभागाच्या बोईसर आगारातून विकृत मनोवृत्तीच्या युवकाने एसटी बस पळविण्याचा प्रयत्न केला, सुदैवाने ही बस झाडाला धडकली, म्हणून पुढील मोठा अनर्थ टळला, यामुळेच या युवकाला थांबवण्यात यश आलं आहे. या युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे.  तरी हा निष्काळीपणा अनेकांच्या जिवावर बेतला असता आणि पुण्याच्या आशोक माने प्रकरणाची पुनरावृत्ती झाली असती, याप्रकरणी पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे.