दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : केंद्र सरकारने देशातला लॉकडाऊन ३० जूनपर्यंत वाढवल्यानंतर राज्यानेही लॉकडाऊनमध्ये वाढ केली आहे. राज्य सरकारने हा लॉकडाऊन वाढवला असला, तरी त्यामध्ये छोटे व्यापारी आणि दुकानदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. यासाठी राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकारच्या नियमावलीनुसार कंटेन्मेंट झोनमध्ये कोणतीही शिथिलता देण्यात आलेली नाही. मुंबई आणि एमएमआर रिजनमधील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रात लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सुट देण्यात आली आहे. यात सकाळी ५ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे, तसंच नागरिकांना ग्रुपने जमा होण्यास बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांना शारिरिक कसरतीसाठी काही वेळ बाहेर पडण्यास परवानगी असेल. यासाठी जवळच्या मोकळ्या जागेचा वापर करता येईल, पण दूर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.


राज्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता, पण या गोष्टी बंदच राहणार


छोटे व्यापारी आणि दुकानांसाठीची नियमावली


प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल आणि तंत्रज्ञ यांना काम करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. तसंच गॅरेजही सुरू करता येणार आहे, पण यासाठी आधी वेळ ठरवून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ३ जूनपासून ही सूट लागू होईल.


५ जूनपासून खालील सूट 


- मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स वगळून सर्व मार्केट, दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरू करण्यास परवानगी, यासाठी सम आणि विषम फॉर्म्युला वापरणार


-  सम तारखेला एका रस्त्यावरील दुकाने तर विषय तारखेला समोरच्या रस्त्यातील दुकाने खुली राहणार


- कपड्याच्या दुकानातील चेंजिंग आणि ट्रायल रुम बंद राहणार


- दुकानात गर्दी होणार नाही याची खबरदारी दुकानदाराने घ्यायची, यासाठी टोकन पद्धत, होम डिलिव्हरीसारखे पर्याय वापरायचे


- खरेदीसाठी लोकांना शक्य असेल तर जवळच्या मार्केटमध्ये चालत,अथवा सायकलने जाण्याच्या सूचना


- अत्यावश्यक वस्तूच्या खरेदीशिवाय इतर वस्तूच्या खरेदीला दूर जाण्यास मनाई


- खरेदीसाठी गर्दी आढळल्यास स्थानिक प्रशासन मार्केट बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते


- अत्यावश्यक सेवेसाठी टॅक्सी १ चालक २ प्रवासी, रिक्षा १ चालक २ प्रवासी, खाजगी चारचाकी १ चालक २ प्रवासी आणि दुचाकीवर केवळ १ ला प्रवास करण्याची परवानगी


- सर्व मार्केट, दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत खुली करण्यास परवानगी, गर्दी आढळल्यास मात्र बंद करण्याचा इशारा


असा असणार राज्यातला लॉकडाऊन ५.०


लॉकडाऊन ५ : शाळा सुरू करण्याबाबत शालेय विभागाचे महत्वाचे धोरण