Weather Update : वातावरणाच्या बदलामुळे अलर्ट जाहीर,पावसाचं पुनरागमन तर काही ठिकाणे उन्हाचे चटके
Maharashtra Weather Update : राज्यात हिवाळ्यात अवकाळी पाऊस पडतोय. तर उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच हवामानात झालेल्या बदलाचं कारण काय? महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात हवामानात बदल होताना पाहायला मिळत आहे. कुठे अवकाही पाऊस, तर दुपारी कडाक्याचं उन्ह आणि संध्याकाळाच वातावरणाचा गारवा असं चक्र असल्यामुळे वातावरणात मोठा बदल झाल्याचं दिसत आहे. देशात झालेल्या या हवमान चक्राच्या बदलामुळे ऐन हिवाळ्यात आता पावसाचा अनुभव घ्यावा लागत आहे. तसेच उन्हाळा अगदी सुरु झाला असताना पाऊस कोसळत असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे.
उत्तरेकडील राज्यांमध्ये येत्या 11 ते 14 मार्चदरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील चार दिवस उत्तरेकडील राज्यांमध्ये अवकाळी पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये दहा ते बारा मार्च या कालावधीत उत्तराखंड या राज्यात हलक्या पावसासह बर्फवृष्टीची शक्यता आहे.
विदर्भापासून मराठवाडा, कर्नाटक ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. दक्षिण ओडिशा आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. मराठवाडा आणि पूर्व विदर्भात अंशतः ढगाळ हवामान होत असून, उन्हाचा चटका वाढल्याने घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे. उकाडा वाढल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत.
पुन्हा परतणार पाऊस
स्कायमेट हवामान अहवालानुसार, आज जम्मू आणि काश्मीर, गिलगिट बाल्टिस्तान, लडाख, हिमाचल प्रदेश आणि मुझफ्फराबादमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवर्षाव अपेक्षित आहे. याशिवाय 12 ते 14 मार्च दरम्यान पंजाबच्या काही भागात पाऊस पडू शकतो. त्याचवेळी 13 आणि 14 मार्च रोजी हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा आणि सिक्कीममध्ये हलका पाऊस पडू शकतो.
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी
त्याच वेळी, 11 ते 14 मार्च दरम्यान, जम्मू-काश्मीर, लडाख, मुझफ्फराबाद, गिलगिट बाल्टिस्तान आणि हिमाचल प्रदेशच्या अनेक भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. याशिवाय 11 ते 14 मार्च दरम्यान उत्तराखंडमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवर्षाव होऊ शकतो.
पाऊस का पडतोय?
हे लक्षात घेण्यासारखे आहे की एकामागून एक अशा दोन वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम उत्तर पश्चिम भारत आणि पश्चिम हिमालयावर होण्याची शक्यता आहे. पहिल्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव 10 मार्चच्या रात्रीपासून तर दुसऱ्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव 12 मार्चच्या रात्रीपासून दिसून येईल. याशिवाय तेलंगणा आणि आजूबाजूच्या परिसरात चक्री वाऱ्यांचे क्षेत्र कायम आहे. यामुळेच पाऊस पडत आहे.