Unseasonal Rains: होळीची आग धगधगती असताना, उन्हाळ्याला सुरुवात झालेली असताना राज्यात अवकाळी पाऊस आलाय. विविध जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. पंढरपूर, वाशिम, अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर, नाशिकमधील चांदवडमध्ये अवकाळी पाऊस पाहायला मिळाला. या पावसामुळे गरमीत हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी आंबा बागांसह उन्हाळी पिकांचे नुकसान झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाशिम जिल्ह्याचे तापमान मागील आठवड्यापासून  40 अंश सेलसियसच्या समोर पोहचलेला असताना आज दुपारी वाशिमच्या मालेगाव तालुक्यासह जिल्ह्यातील काही ठिकाणी अचानक विजेच्या कडकडाटासह बरसलेल्या अवकाळी पाऊसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना बारसलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने वाशीमकरांना दिलासा मिळाला.पावसाचे कोणतेही लक्षण नव्हते मात्र विजेच्या कड -कडाटासह अवकाळी पावसाला सुरवात झाली आहे.या पावसामुळे आंबा बागांसह उन्हाळी पिकांना फटका बसणार असल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे.


विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता


हवामान खात्याने विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे संयकाळी मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली...अकोला जिल्हाचा तापमान मागील दोन दिवसापासून 42 अंशावर पोहचला आहेय..आज अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने एकच धावपळ उडाली आहेय..या अवकाळी पावसामुळे गहू, फळ पिकाचा नुकसान झाल्याचे चिन्ह आहे.


नाशकात रस्त्यावरुन वाहू लागले पाणी


नाशिकच्या चांदवड तालुक्यातील सोनी सांगवी,विटावे, साळसाने,पाटे, कोलटेक परिसरात बेमोसमी पावसाने हजेरी लावली आहे,काही ठिकाणी तर रस्त्यावरून पाणी वाहु लागले तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला,अवकाळी पावसामुळे बळीराजा मात्र धास्तावला आहे. नाशिक जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वतावरणासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


पंढरपूर परिसरातदेखील अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे.