रत्नागिरी : जिल्ह्यात लांजा आणि संगमेश्वर तालुक्यात अवकाळी पाऊस  (rain)  झाला. दरम्यान, अवकाळी पावसामुळे यंदा कोकणातील (Konkan) आंबा (Mango) आणि काजू उत्पादनावर ( rains hit mango crop in Ratnagiri) परिणाम झाला आहे. आंबा उत्पादनात तब्बल 40 टक्के घट होण्याची शक्यता आहे. उशिरानं आलेला मोहोर, रोगांचा सामना यावर्षी मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज दुपारी लांजा आणि संगमेश्वर तालुक्यात दोन वाजण्याच्या सुमाराला अचानक पाऊस झाल्याने, मुंबई - गोवा महामार्गावर एकच धांदल उडाली. कुवे वाकेड घाटात दमदार पावसाच्या सरीने नागरिकांना झोडपले. तर रात्री गुहागर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दिवसभर उष्णता रात्री गारवा अशा वातावरणात पावसानंही हजेरी लावल्यानं आंबा उत्पादक धास्तावलेत.



अवकाळी पावसामुळे यंदा कोकणातील आंबा आणि काजू उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे जवळपास केवळ दीड ते दोन महिनेच यंदा हापूस उपलब्ध होणार आहे. कारण आंबा उत्पादनात तब्बल 40 टक्के घट होण्याची शक्यता आहे. उशिरानं आलेला मोहोर, रोगांचा सामना यावर्षी मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे. त्यामुळे आंबा उत्पादकांना आर्थिक फटका तर बसतोच आहे. शिवाय, हापूसची चव चाखणाऱ्यांच्या खिशाला, वाढलेल्या दरांमुळे कात्री बसणार आहे.