Maharashtra Weather Unseasonal Rain : राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्यांना झोडपले, पिकांचे नुकसान
Unseasonal Rain : राज्यात लातूर, वाशिम आणि परभणीजिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पिकांना तडाखा बसला आहे. परभणीतील पाच तालुक्यात गारपीटीने मोठे नुकसान झाले आहे.
Maharashtra Weather Unseasonal Rain : राज्यात मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. लातूर, वाशिम आणि परभणीजिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पिकांना तडाखा बसला आहे. परभणीतील पाच तालुक्यात गारपीटीने मोठे नुकसान झाले आहे. तर लातूर जिल्ह्यात दुपारनंतर अनेक भागात जोरदार वाऱ्यासह गाराचा पाऊस झाला. वाशिमच्या शेलुबाजार परिसरात अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकांसह फळबागांचे नुकसान झाले आहे.
लातूर जिल्ह्यात दुपारनंतर जोरदार पाऊस
लातूर जिल्ह्यात दुपारनंतर अनेक भागात जोरदार वाऱ्यासह गाराचा पाऊस झाला. अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला तर उदगीर शहरात झाडे उन्मळून पडले आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर, औसा, शिरूर अनंतपाळ भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. वादळी वारा आणि विजेच्या गडगडाटासह पावसानं दमदार हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यामुळं उदगीर शहरातील नगरपालिकेच्या पाठीमागे उभे असलेल्या कार वरती झाड उन्मळून पडले आहे तर त्यांचं शहरालगत असलेल्या भागातील ST कोलनीमध्ये रस्त्यावर झाडं उन्मळून पडली आहेत.
औसा तालुक्यातील लख शिवणी भागात गाराचा पाऊस पडला आहे. जिल्ह्यात सर्वत्र दुपारपर्यंत कडाक्याचे ऊन पडले होते. त्यानंतर दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला तर काही ठिकाणी गाराचा पाऊस पडला आहे.जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळं जिल्ह्यात आणखी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जातेय.
परभणीत वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पिकांना तडाखा
परभणी जिल्ह्यत अवकाळणी गारांचा पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, परभणीच्या सेलू,पूर्णा,जिंतूर,मानवत तालुक्याला पावसाने झोडपून काढलंय, यामुळे ज्वारी,आंबा,केळी, बियांचा पिकांचे अतोनात नुकसान झालं आहे, चक्रीवादळामुळे घरावरील पत्रे उडून गेलेत. ठिकठिकाणी विद्युत पोल उडघडून पडली आहेत, या बरोबरच पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, परंपरागत पिकांना फाटा देत सेलू तालुक्यातील कुपटा येथील मिराताई सोळंके या प्रयोगशील शेतकरी महिलेने आंबा लागवड केली होती, त्यांच्या शेतातील आंब्याचा सडा वादळी वाऱ्यांमुळे पडलाय.
वाशिम येथे अवकाळी पावसामुळे भाजी - फळबागांचे नुकसान
वाशिम जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही काल सायंकाळ दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली असून यात शेतकऱ्यांच्या मुग, ज्वारी, हळद भाजीपाला पिकांसह फळबागाचे नुकसान झाल आहे.मंगरुळपिर तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीनं वनोजा येथील गजानन राऊत या शेतकऱ्यांची तोडणीस आलेल्या लिंबाची मोठ्या प्रमाणात झाडं उनमळून पडली. त्यामुळं या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे.तर तपोवन येथील योगेश भाऊराव येवले यांच्या शेतातील बीजवाई कांद्याची लागवड केलेली होती त्यांचंही वादळी वाऱ्याने व गारपिटीनं संपूर्ण पिकं नष्ट झालं आहे. शासनाने पिकं नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.