प्रफुल्ल पवार / अलिबाग : रायगड (Raigad) जिल्ह्याच्या सर्वच भागात आज पहाटेपासूनच पावसाने हजेरी (Rain) लावली आहे. सकाळी थोडी उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा ७.४० वाजल्यापासून सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. तसेच हातचे आंबा पिक जाण्याची भीती आंबा बागायतदारांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात सर्वच तालुक्यात अवकाळी पाऊस पडत आहे.  



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


रायगड जिल्ह्यात आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास चांगला पाऊस झाला. जिल्ह्याच्या पोलादपूर ते अलिबाग सर्वच भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. अलिबाग , महाड , म्हसळा , पेण , खोपोली , माणगाव , रोहा , मुरुड या भागात पहाटेच्या सुमारास जोरदार पाऊस झाली . काही भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस बरसला.


सध्या रिमझिम पाऊस सुरू आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वातावरणात बदल झाला. या अवकाळी पावसाचा आंबा पिकावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.