बांधकामात मजुबती आणि भेगा दुरुस्तीसाठी कलिंगडच्या बियांचा वापर..व्हीएनआयटीत संशोधन
बांधकामांची मजबूती वाढविण्यासाठी रासायनिक मिश्रणांचा वापर केला जातो
अमर काणे, झी मीडिया, नागपूर : संपूर्ण जगात बांधकामात मजबुतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसीत करण्यात येतेय....त्याच दृष्टीनं राज्याच्या उपराधानीत व्हीएनआयटी अर्थात विश्वेश्वरय्या नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संधोधकांनी बांधकामामध्ये मजबूती आणण्यासाठी आणि भेगा दुरुस्तीसाठी कलिंगडच्या बियांचा यशस्वी वापर केलाय. (Use of watermilon seeds for strength and repair in construction, VNIT Research) त्यांनी प्रयोगशाळेत केलेले प्रयोग शंभर टक्के यशस्वी ठरले आहे. व्हीएनआयटीच्या सिव्हील इंजिनिअरिंगच्या डॉक्टर मधुवंती लाटकर गेल्या सहा वर्षांपासून याकरता संशोधन करत होत्या. डॉक्टर लाटकर आणि त्यांच्या टीमला याकरता इंडियन पेटंट ऑफिसकडून पेटंट मिळालं आहे.
कुठल्याही बांधकामात मजबूती व दर्जाच्या दृष्टीनं नवनवीन तंत्रज्ञान विकसीत होतं असतं. त्यासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक करण्यात येतेय. बांधकामांची मजबूती वाढविण्यासाठी रासायनिक मिश्रणांचा वापर केला जातो.मात्र त्यात प्रामुख्यानं दोन मर्यादा आहे..एक तर आर्थिक भार जास्त लागतो शिवाय प्रदुषणाचाही धोका आहे.त्यामुळं कमी किंमतीचा आणि पर्ययावरणपुरक पर्याय मिळावा यादृष्टीनं व्हीएनआयटीच्या सिव्हील इंजिनियरिंगच्या डॉक्टर मधुवंती लाटकर गेल्या सहावर्षांपासून संशोधन करत होत्या.
बायोसिमेंटेशनचा उपयोग कसा करता येईल यावर त्यांचे संशोधन सुरु होतं. संशोधनादरम्यान कलिंगडाच्या बियांचा उपयोग हा काटकसरिचा व पर्यावरण पुरक असल्याचं त्यांच्या संशोधानात दिसून आलं. याबाबत डॉक्टर लाटकर यांनी सांगितले की सामान्य कॉक्रीटेपेक्षा कलिंगडच्या बियांचा वापर करून केलेल्या बायोसिमेंटेड क्रॉक्रिटची दाबशक्ती 22 टक्के वाढली आहे.त्याचबरोबर 19 टक्के पाणी शोषण्याची क्षमता कमी झाली आहे.यातूनचं बायोसिंमेटेशनची वैधता सिद्ध होते.शिवाय डॉक्टर लाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्निग्धा भुंतांगे या विद्यार्थीनीने अनेक प्रयोगांच्या आधारे याची सांख्यिकी विश्वसनीयताही पडताळून दाखवली आहे.
त्यामुळे बांधकामांत मजबुतीसाठी तसेच भेगा बुजविण्यासाठी कलिंगड बियांचा वापर भविष्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा ठरणार आहे...सध्या प्रयोगशाळेत केलेल प्रयोग शंभर टक्के यशस्वी ठरले आहेत. आता प्रत्यक्ष इमारतीमध्ये वा बांधकामठिकाणी ही वापरली असता त्यात किती यश मिळेल याची तपासणी करणं गरजेचं आहे.या फिल्ड व्हॅलिडेशन स्टडीमध्ये यश मिळालं तर बांधकाम मजबूतीच्यादृष्टीनं मोठी भरारी राहिल.