`झी २४ तास`च्या प्रतिनिधीला धक्काबुक्कीचा माध्यम प्रतिनिधींकडून निषेध
`झी २४ तास`चे प्रतिनिधी मुस्तान मिर्झा यांना झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध
उस्मानाबाद : झी २४ तासचे प्रतिनिधी मुस्तान मिर्झा यांना झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध करण्यात येत आहे. सर्व माध्यम प्रतिनिधींनी काळ्या फिती लावून हा निषेध व्यक्त केला. धक्काबुक्कीच्या प्रकाराला बारा तास उलटूनही पोलिसांनी काहीही कारवाई केलेली नाही. याबाबत तीव्र नाराजी पत्रकारांनी व्यक्त केली आहे.
या घटनेची गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दखल घेतली असून, उस्मानाबादच्या एसपींना चौकशीचे आदेश दिले आहेत. पण आता १३ तास उलटूनही संबंधितांवर अद्याप कारवाई न झाल्याने संताप व्यक्त केला जातोय.