औरंगाबाद :वैजापूरमध्ये मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे. भरदिवसा शाळकरी विद्यार्थिनीच्या खांद्याला धक्का मारून तिचा हात पकडण्यात आला. बसस्थानकात ही घटना घडली. पण या रणरागिणीनं आसपासच्या नागरिकांच्या मदतीनं या रोडरोमियोला चांगलाच चोप देऊन पकडून पोलिसांच्या हवाली केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षय त्रिभुवन असं या तरुणाचं नाव आहे. शाळेतून बस स्थानकाकडे जात असताना या मुलीचा अक्षयनं पाठलाग केला. बसस्थानाक येताच त्यानं तिचा विनभंग केला. सुरुवातीला घाबरलेल्या या मुलीनं अखेर हिंमत दाखवली आणि मैत्रिणींच्या मदतीनं त्याला पकडलं आणि पोलीस येताच त्याला त्यांच्या हवाली केलं.  मुलीच्या तक्रारीवरून अक्षय त्रिभुवन याच्याविरुद्ध विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अक्षय वर्षभरापासून या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिला त्रास देत होता मात्र तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. दोन-तीन दिवसांपूर्वीही काही टवाळखोर मुलांनी बस-स्थानकात मुलींची छेड काढली होती. त्यावेळी याबाबत पोलिसांना फोनवरून माहिती मिळाल्याने ते जाईपर्यंत टवाळखोर पसार झाले होते. त्या टवाळखोरांत अक्षय हाही होता. पोलिसांनी त्याचवेळी या घटनेची गंभीरतेने दखल घेतली असती तर  हा प्रकार घडलाच नसता.