Vande Bharat express ticket rates : नवं तंत्रज्ञान आणि अद्ययावत सुविधा असणाऱ्या Vande Bharat express च्या निमित्तानं देशात एक नवी क्रांती सध्या पाहायला मिळत आहे. रेल्वे क्षेत्रात हे एक नवं रुप पाहताना अनेकजण भारावनही जात आहेत. मुख्य म्हणजे या Vande Bharat express नं प्रवास करण्याची संधी मिळणार असल्यामुळे अनेकांनाच प्रचंड आनंद होत आहे. पण, हा प्रवास तुम्हाला खरंच परवडणारा आहे का? या प्रश्नाचं उत्तर आधी जाणून घ्या. कारण, हा प्रवास काहीसा खिशाला फटका देणारा ठरू शकतो. (Vande Bharat express ticket rates)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकमार्गे जाणाऱ्या मुंबई-शिर्डी (Mumbai Shirdi) आणि पुणेमार्गे जाणाऱ्या मुंबई- सोलापूर (Mumbai Solapur ) ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चे तिकीट दर अपेक्षेहून जास्त असल्याची माहिती समोर आली आहे. बरं तिकीट दर जास्त असले तरीही त्यामध्ये खाद्यपदार्थांचाही समावेश नाही, त्यामुळं या प्रवासात तुम्हाला जीभेचे चोचले पुरवायचे असल्यास तिथं जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळं नाराजीत आणखी भर नक्की. 


हेसुद्धा वाचा : Shaktipeeth Mahamarg : 'समृद्धी' नंतर आता मिशन 'शक्तिपीठ'! कसा असणार हा ग्रीन फिल्ड सुपरफास्ट हायवे?


 


पंतप्रधान नरेंद्र मोदी या वंदे भारत एक्स्प्रेसच्या तीन नव्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहे. यातून प्रवास करण्यासाठी तुम्हाला चेअर कारमध्ये पुण्यापर्यंतच्या प्रवासासाठी 560 रुपये तर, सोलापूरपर्यंतच्या प्रवासासाठी 965 रुपयांचं तिकीट काढावं लागणार आहे. 


वंदे भारतनं प्रवास करण्यासाठीचे इतर तिकीट दर 


एक्झिक्युटीव्ह श्रेणी- 1135, मुंबई- सोलापूर प्रवासासाठी 1970 रुपये 
मुंबई-साईनगर शिर्डी - नाशिकपर्यंतचं तिकीट 550 रुपये, शिर्डीपर्यंत 800 रुपये 
मुंबई-साईनगर शिर्डी एक्झिक्युटीव्ह श्रेणी- नाशिकपर्यंत 1150 रुपये आणि शिर्डीपर्यंत 1630 रुपये 


वरील तिकीट दरांमध्ये खाद्यपदार्थांचे दर नसल्यामुळं प्रवाशांना त्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतील ही बाब लक्षात घ्यावी. बरं, सध्याचे रेल्वे दरही याहून कमी असल्यामुळं अनेक प्रवाशांनी वंदे भारतच्या तिकीट दर पाहून नकारघंटाच वाजवली आहे. 


या मार्गावरील सध्याचे रेल्वे दर


मुंबई-पुणे डेक्कन क्वीन 


चेअर कार - 385 रुपये


व्हिस्टाडोम - 995 रुपये


दादर-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस


स्लीपर - 270 रुपये


तृतीय वातानुकूलित (Third AC) - 730 रुपये


द्वितीय वातानुकूलित -1035 रुपये


सीएसएमटी-सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस


शयनयान - 305 रुपये


तृतीय इकॉनॉमी - 665 रुपये


तृतीय वातानुकूलित - 720 रुपये 


द्वितीय वातानुकूलित - 1000 रुपये 


प्रथम वातानुकूलित - 1675 रुपये 


वंदे भारतनं प्रवास करण्यासाठी तुमचा किती वेळ खर्च होणार? 


Vande Bharat express नं प्रवासादरम्यान मुंबई ते शिर्डी हे अंतर ओलांडण्यासाठी 5 तास 20 मिनिटं इतका वेळ लागत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तुलनेनं मुंबई ते सोलापूर अंतरासाठी प्रवाशांचे 6 तास 30 मिनिट खर्च होणार आहेत.