शासकीय रुग्णालयातून नवजात बाळ बेपत्ता
जिल्ह्यातल्या वणी ग्रामीण रुग्णालयातून नवजात बाळ बेपत्ता झालं. रुग्णालयात सीसीटीव्ही नादुरुस्त आहेत. सुरक्षारक्षक तिथे उपस्थित नव्हता आणि वैद्यकीय अधिक्षकही गैरहजर होते. त्यामुळं खळबळ उडालीय.
यवतमाळ : जिल्ह्यातल्या वणी ग्रामीण रुग्णालयातून नवजात बाळ बेपत्ता झालं. रुग्णालयात सीसीटीव्ही नादुरुस्त आहेत. सुरक्षारक्षक तिथे उपस्थित नव्हता आणि वैद्यकीय अधिक्षकही गैरहजर होते. त्यामुळं खळबळ उडालीय.
सहा नोव्हेंबरला नुसरत जबी अब्दुल गफ्फार शेख या महिलेची प्रसुती झाली. आज रुग्णालयातून तिला सुटी दिली जाणार होती. मात्र त्याआधीच मध्यरात्री १ ते ४ च्या दरम्यान महिलेचं बाळ चोरीला गेलंय. तिला जाग आली त्यावेळी ही बाब लक्षात आली.
तातडीनं बाळाचा शोध घेण्यात आला. मात्र सुरक्षारक्षक सीसीटीव्ही नसल्यानं पोलिसांना कुठलाही सुगावा लागत नव्हता. वणी पोलीस या प्रकरणाचा पुढचा तपास करत आहेत. रुग्णालय प्रशासनवर नातेवाईकांनी आरोप केलेयत.
दरम्यान, पोलिसांनी पाच तासात या प्रकरणाचा छडा लावत आरोपीला अटक केली आहे. जिल्ह्यात एक टोळी सक्रीय असल्याची पोलिसांनी शक्यता वर्तविली आहे.