मुंबई : उत्तर प्रदेशमधील हाथरस बलात्कार आणि हत्या या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यासाठी वसई येथे जमलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा पाहायला मिळाला. बॅनर ओढण्यावर हा राडा झाल्याने हाथरस घटनेच्या निषेध राहिला बाजुला आणि कार्यकर्त्यांमध्येच तुंबळ मारामारी झाल्याचे पाहायला मिळाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस कार्यकर्त्यांनी वसई तहसील कार्यालया समोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर काल निषेध आंदोलन केले होते. मात्र या दरम्यान पत्रकारांना प्रतिक्रिया देताना बॅनर खेचल्याच्या वादातून  दोन काँग्रेस कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली आणि याच बाचाबाचीचे रूपांतर चक्क हाणामारीत झाले. 


काँग्रेस पदाधिकाऱ्यांसमोरच ही हाणामारी झाली. त्यांनी हाणामारी सोडविण्याचाही प्रयत्न केला. मात्र कार्यकर्त्यांमधला वाद वाढत गेल्याने आंदोलनाच्या ठिकाणी गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. निषेध आंदोलनदरम्यान कार्यकर्त्यांमध्येच झालेल्या या हाणामारी पाहण्यासाठी गर्दी झाली आणि या राड्याची चर्चा सुरु झाली होती.