प्रथमेश तावडे, झी मीडिया, भाईंदर : वसईत (Vasai) 57 हजाराच्या जुन्या चलनी नोटा (currency note) सापडल्याची घटना घडलीय. ही घटना वसईच्या भुईगाव किनाऱ्यावर (Bhuigaon Beach) घडली आहे. स्वछता मोहीम राबवायला आलेल्या दाम्पत्याला या नोटा सापडल्या आहेत. या नोटा दाम्पत्याने पोलिसांच्या ताब्यात दिल्या आहेत. पोलीस या नोटा नेमक्या कोणाच्या आहेत, याचा शोध घेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वसईत (Vasai) राहणारे लिसबोन फेराव व त्यांच्या पत्नी सुजान फेराव भुईगाव समुद्र (Bhuigaon Beach) किनाऱ्यावर दर रविवारी स्वछता मोहीम राबवतात. या रविवारी अशीच एक स्वछता मोहीम राबवताना या जोडप्याला नोटांची बॅग सापडली होती. या बॅगेत 57 हजाराच्या जून्या नोटा सापडल्या आहेत. या नोटा सध्या चलनात वापरात नाही आहेत, त्याऐवजी दुसऱ्या नवीन नोटा चलनात आहेत. 


लिसबोन फेराव नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी स्वच्छता मोहिम राबवायला गेले होते. यावेळी समुद्र किनाऱ्यावरील प्लास्टिक व कचरा गोळा करताना त्यांना एक बॅग सापडली होती. या बॅगमध्ये नोटा आढळून आल्या आहेत. या बॅगेत एक हजारांच्या तीन नोटा व पाचशेच्या 108 नोटा सापडल्या आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदीने 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदी केली होती. या नोटबंदी 500 आणि हजाराच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर नागरीकांनी रांगेत लागून नोटा बदलल्या होत्या. तर काहिंचा काळा पैसा होता म्हणून त्यांनी जाळल्याच्या व समुद्रात फेकल्याच्या देखील घटना समोर आल्या होत्या. मात्र वसईत आता नोटबंदीनंतर हे पैसे काही कामाचे नसल्याने कोणीतरी ह्या नोटा फेकून दिल्याची घटना घडली आहे, असा अंदाज बांधला जातं आहे.


दरम्यान दाम्पत्याने या नोटा आता वसई पोलिसांच्या (Vasai Police) ताब्यात दिल्या आहेत.या नोटा नेमक्या कोणाच्या आहेत, याचा तपास सुरु आहे.