नाशिक : Nashik Municipal Election : शिवसेना (shiv sena ) भाजपला (BJP) जोरदार दे धक्का देण्याच्या तयारीत आहे. वसंत गिते (Vasant Gite) भाजपमध्ये नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. (Vasant Gite angry in BJP)  वसंत गिते यांचे चिरंजीव प्रथमेश यांनी आज नाशिकमध्ये शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी भेट घेतली. त्यामुळे या भेटीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. वसंत गिते यांची भाजप नाराजी दूर करणार का, याकडे लक्ष असताना मुलाने राऊत यांची भेट घेतल्याने नवे संकेत मिळत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान शिवसेना भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. भाजप नेते आणि माजी उपमहापौर नगरसेवक प्रथमेश गिते हे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रथमेश गिते यांनी राऊत यांची भेट घेतल्याने त्यांचा प्रवेश निश्चित असल्याचे बोलले जात आहे.


दरम्यान, वडील वसंत गिते यांचा वाढदिवस असल्याने आपण सदिच्छा भेट घेतली असल्याचे प्रथमेश वसंत गिते यांचे म्हणणे आहे. मात्र आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या (Nashik Municipal Election) पार्श्वभूमीवर वसंत गिते हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील अशी चर्चा आहे. प्रथमेश यांना विचारले असता भारतीय जनता पक्षात काम करु दिले जात नसल्याने येत्या काही दिवसात प्रवेश होऊ शकतो, अशी शक्यता प्रथमेश गिते यांनी व्यक्त केली आहे. प्रथमेश गीते भारतीय जनात पक्षाचे माजी उपमहापौर आहेत. त्यामुळे गिते भाजपला सोडचिठ्ठी देणार हे यावरुन दिसून येत आहे.