परदेशी नोकरीचं आमीष; आरोपींना बेड्या
परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ग्राहकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या दोघा आरोपींना वाशी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात.
वाशी : परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ग्राहकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या दोघा आरोपींना वाशी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. प्रविणकुमार लालचंद आणि श्रीमती तेजस विशाल टंडन अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
कॅनडात नोकरी लावण्याचे आमिष
आरोपी वाशीतील हावरे इन्फोटेक पार्क मधील व्हेंचर्स ओव्हरसीज करियर कन्सल्टंट या कंपनीच्या माध्यमातून कॅनडा या देशात नोकरी लावण्याचे अमिष दाखवून ग्राहकांना लाखोंचा गंडा घालत होते.
वेगवेगळी नावे सांगून ग्राहकांची फसवणूक
आरोपी वेगवेगळी नावे सांगून ग्राहकांची फसवणूक करत होते. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून चार लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
अंदाजे 15 ते 20 ग्राहकांची फसवणूक झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबतीत पोलीस अधिक तपास करत आहेत.