Vegetable Price Hike News In Marathi : जून महिना संपत आला तरी राज्यात मान्सूनचे आगमन झाले नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. राज्यातील मान्सून लांबल्याने भाजीपाल्याच्या (Vegetable Price Hike) उत्पन्नावर परिणाम झाला आहे. यामुळे मुंबईसह राज्यात टोमॅटो, कोथिंबीरचे दर गगनाला भिडले आहेत. यामध्ये टोमॅटो 50 रुपये किलो तर कोथिंबीर जुडी 40 रुपयांपर्यं गेल्याने गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मान्सूनचे आगमन लांबल्याने खरीपाच्या पेरण्या लांबल्या आहेत. पाऊस लांबणे आता शेतमालाची आवक कमी झाली आहे. याचा परिणाम भाजीपालाच्या दरावर दिसून येत आहे. तर दुसरीकडे आकाशाकडे डोळे लावून बसलेला बळीराजा मात्र पावसाचे लवकर आगमन होण्याची वाट पाहत आहे. 


सध्या तरी सरासरी भाज्यांच्या दरामध्ये किमान 15 ते 20 रुपये तर काही भाज्यांमध्ये 50 ते 60 रुपये दरवाढ झाली आहे. त्यातच  बदलत्या हवामानाचे भाजीपाल्यावर विपरीत परिणाम होऊन उत्पादन कमी निघाल्याने बाजारातील आवक घटली आहे.  किरकोळ बाजारात मेथी, कोथिंबीर 30 ते 40 रुपये जूडी तर मिरची 60 ते 80 रुपये किलो, इतर फळभाज्या 50 ते 60 रुपये किलो या दराने विकल्या जात आहेत.  


राज्यात बिपरजॉय वादळाचा प्रभाव कमी झाला आहे. येत्या तीन दिवसांत मान्सून सक्रिय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 23 जूनपासून मान्सून आणखी सक्रिय होईल, असा अंदाज वर्तवला गेला आहे. त्यामुळे नागरिकांना आणखी काही दिवस पावसाची वाट पाहावी लागणार आहे.


प्रतिकिलो दर


वांगी : 40 रुपये


मिरची : 60 ते 65 रुपये


कोथिंबीर : 40 ते 50 रुपये जुडी


चवळी शेंग : 40 रुपये


गवार शेंग : 60 रुपये


शिमला मिरची : 60  रुपये


पडवळ : 40 रुपये


कारली : 40 रुपये


भेंडी : 60 रुपये


कोहळे : 15 ते 20 रुपये


फुलकोबी : 40 रुपये


पतकोबी : 40 रुपये


काकडी : 40 रुपये


मुळा : 20 रुपये


गाजर : 30 ते 40 रुपये


टोमॅटो : 50 ते 60 रुपये


मेथी : 20 ते 40 रुपये जुडी


पालक : 30 रुपये जुडी


फणस : 40 ते 50  रुपये


वाल शेंगा : 60 रुपये