विरार : येथील भाजी विक्रेत्याकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचं उघड झालंय. पिंपात भाज्या भरून त्या पायाने धुतल्या जात असल्याचा व्हीडीओ उघड झालाय.


विरार पूर्व भागातल्या चंदनसार भाजीबाजारात हा प्रकार सुरू असल्याचं दिसून येतंय. एका पिंपात भाजी, काकड्या, गाजरं भरून ती पायाने धुतली जात असल्याचा प्रकार उघड झालाय. भाजीविक्रेत्याने झालेला प्रकार मान्य करत, अशीच भाजी धुतली जाते असंही मान्य केले आहे.