भाडेकरूंसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी दिलासादायक बातमी
मात्र आता भाडेकरूंची ही कटकट कायमची मिटणार आहे. आता ही पडताळणी ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा निर्णय मुद्रांक शुल्क विभागानं घेतलाय.
अरूण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : आता बातमी भाडेकरूंसाठी अत्यंत महत्त्वाची. भाडेकरार करताना पोलीस ठाण्यात जाऊन व्हेरिफिकेशन करावं लागतं. मात्र लवकरच ही कटकट मिटणार आहे. प्रशासनानं तंत्रज्ञानाचा आधार घेत भाडेकरूंना दिलासा देण्याचा निर्णय घेतलाय (verification of tenants will now be online a big decision of stamp duty department)
घर भाड्यानं घेताना पोलीस स्टेशनला जाऊन व्हेरिफिकेशन करावं लागतं. मात्र आता भाडेकरूंची ही कटकट कायमची मिटणार आहे. आता ही पडताळणी ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा निर्णय मुद्रांक शुल्क विभागानं घेतलाय. त्यानुसार, भाडेकरार नोंदवताना ई रजिस्ट्रेशन पोर्टलमार्फत माहिती संबंधित पोलीस ठाण्याला पाठवली जाते.
आता त्या माहितीची पडताळणी पोलिसांमार्फत केली जाईल. त्यामुळे भाडेकरूंना आता पोलीस स्टेशनला जाण्याची गरज उरणार नाही. यासाठी राज्यातील 1 हजार 130 पोलीस स्टेशन पोर्टलशी जोडण्यात आले आहेत.
राज्यात दरमहा सुमारे 85 हजार भाडेकरार होतात. सध्या पुणे महापालिका क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीये. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर येत्या 3 ते 5 महिन्यांमध्ये राज्याच्या गावागावात ही सुविधा पोहोचलेली असेल.
घरबसल्या नोंदणी करण्याची सुविधा देत मुद्रांक शुल्क कार्यालयाच्या खेपा तर वाचल्याच पण आता पोलीस स्टेशनची वारीही करावी लागणार नाही.