विदर्भात नागपूर, वर्धा जिल्ह्यात जोरदार अवकाळी पाऊस
नागपूर शहरात (Rain in Nagpur) रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली.
नागपूर, वर्धा : नागपूर शहरात (Rain in Nagpur) रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून नागपुरात (Nagpur) वातावरण बदलले आहे. सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. काल रात्री मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. अवकाळी पावसानं शहरात चांगलाच तडाखा दिला. ग्रामीण भागातही झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, वर्धा जिल्ह्यात (Rain in Wardha ) अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. विजांच्या कडकडाटासह इथे जोरदार पाऊस झाला. त्यामुळे, इथल्या ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित झालाय. जिल्ह्याच्या देवळी, वर्धा, हिंगणघाट, सेलू , समुद्रपूर आणि आर्वी तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी चिखलदऱ्यात जोरदार गारपीट झाली होती. गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर नांदेडमध्ये गुरुवारी रात्री उशिरा अवकाळी पाऊस झाला. मध्यरात्री हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. तसेच वाशिम जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार अवकाळी पाऊस झाला. (Strongly Rain in Amravati, Nanded, Washim )
अमरावती जिल्ह्यालाही गारपीटचा मोठा तडाखा बसला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गारपीटीमुळे चिखलदरा येथील पंचबोल पॉइंटवर गारांचा खच पाहायला मिळाला. गारपीटीमुळे या भागात काश्मीर सारखे वातावरण निर्माण झाले होते.