Video : दे धपाधप! कॉलेजमध्ये तरुणींची फ्री स्टाइल, कारण ऐकून बसेल धक्का
Sambhaji Nagar Free Style : तरुणी असो या महिला यांच्यामध्ये कशावरुन वाद होईल याचा काही नेम नाही. त्यामधील वाद अनेक वेळा एवढा विकोपाला जातो की त्याचं रुपांतर हाणामारीत होतं. सोशल मीडियावर तरुणी किंवा महिलांची फ्री स्टाइल मारामारीचे अनेक व्हिडिओ पाहिला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.
Girls Fight Video : मुंबईची लोकल ट्रेन (Mumbai local train) असो किंवा जीम, मार्केट असो किंवा एखाद्या कार्यक्रम महिलांमध्ये वाद झाल्यावर थेट कुस्ती सुरु होते. आपण सोशल मीडियावर (Social media video) अनेक व्हिडिओ पाहिले आहेत. ज्यामध्ये अगदी अनेक वेळा क्षुल्लक कारणामुळे त्यांचा वाद होतो पण त्यानंतर त्या एकमेकांचे केस उपटण्यापासून कपडे फाडण्यापर्यंत तुफान राडा घालतात. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये तर सीट वरुन महिलांची हाणामारी होते. या घटनाचे अनेक व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर पाहिला मिळतात.
तरुणींची फ्री स्टाइल (Free style Fight) हाणामारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. असाच एक तरुणींचा राडा (Girls Fight Video) सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. भरदिवसा कॉलेजच्या मैदानाला या तरुणींनी कुस्तीचं मैदानात रुपांतर केलं होतं. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता दोघींनी मिळून एका तरुणीला बेदम मारहाण केली. त्या दोघींनी अक्षरशा त्या तरुणीला बेल्टने मारलं.
कारण ऐकून बसेल धक्का
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तरुणीचे केस पकडून तिला खाली खेचलं. तर दुसरीने तिच्यावर बेल्टने वार केले. हा कुठल्या चित्रपटाचा सीन नाही हे घडलं आहे महाराष्ट्रातील संभाजीनगर म्हणजे पूर्वीचं औरंगाबादमध्ये...औरंगपुरा परिसरातील सरस्वती भुवन महाविद्यालाच्या पार्किंगमध्ये हा WWE चा थरार घडला. अखेर महिला सुरक्षा रक्षकाने ही हाणामारी थांबवली आणि तरुणींना तिथून घेऊन गेली. (Video Girls freestyle fight wwe on boyfriend sambhaji nagar aurangabad)
हेही वाचा - Video : खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों! पालकांच्या नजरेआड ट्रेनमध्ये मुला - मुलीचा रोमान्स
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल एवढ्या राडा करायला नेमकं झालं तरी काय होतं? बॉयफ्रेंडवरुन हे सगळं महानाट्य घडलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
बेल्ट, लाथाबुक्यांसह तुफान हाणामारीचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.