Pankaja Munde :  अखेर पाच वर्षानंतर पंकजा मुंडे आमदार बनल्या आहेत. लोकसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची लॉटरी लागली लागली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागणार आहे. विधानसभा आमदारांमार्फत विधानपरिषदेवर निवडल्या जाणा-या 11 जागांसाठी निवडणुक झाली. या निवडणुकीत पंकजा मुंडे विजयी झाल्या आहेत. पंकजा मुंडे यांना 26 मत पडली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभेपाठोपाठ लोकसभा निवडणुकीतही पंकजा मुंडेंना दारूण पराभव झाला. पंकजा मुंडेंना विधानपरिषदेवर पाठवून त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा प्लॅन भाजपनं आखला होता. अखेर भाजने पंकजा मुंडे यांचे  राजकीय पुनर्वसन  केले आहे.
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये पंकजा मुंडे महिला आणि बालविकास मंत्री होत्या. 


2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदार संघात भाऊ धनंजय मुंडे यांनीच पंकजा मुंडे  हरवलं होते. यंदा लोकसभा निवडणुकीत भाजपने प्रीतम मुंडेंऐवजी पंकजा मुंडेंना लोकसभेचं तिकीट दिले. बीड लोकसभा मतदारसंघात बजरंग सोनावणेंनी पंकजा मुंडे यांचा दारूण पराभव केला. यानंतर पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी भाजपने त्यांनी विधानपरिषदेची उमेदवारी दिली. अखेर या निवडणुकीत पंकजा मुंडे विजयी झाल्या आहेत.