Vidhan Parishad Election 2024:  विधान परिषदेच्या निवडणुकीत मविआचे उमेदवार शेकापचं जयंत पाटील यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र, या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार झाल्याचा आरोप दोन्हींकडूनही करण्यात आलाय. स्वतः पराभूत उमेदवार जयंत पाटील यांनी अशा प्रकारचा घोडेबाजार कधीही पाहिला नसल्याचा आरोप केलाय. विधान परिषदेच्या निवडणुकीत आमदारांचा भाव 20 ते 25 कोटी असल्याचं म्हणत ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती असा आरोप राऊतांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कालच्या विधान परिषद निवडणुकीत आमदारांचा भाव 20 ते 25 कोटी इतका होता...आमदारांना 2 एकर जमीन आणि पैशांचं वाटप केलं...ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती असा आरोप राऊतांनी केलाय...तर संजय राऊत हे फेक नरेटिव्हचे बादशहा आहे...अशी टीका शेलारांनी राऊतांवर केलीय...तर महाराष्ट्राची जनता राऊतांकडे करमणूक म्हणून बघते असा टोला केसरकरांनी लगावला आहे.


निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती असा आरोप राऊतांनी केलाय...तर संजय राऊत हे फेक नरेटिव्हचे बादशहा आहे...अशी टीका शेलारांनी राऊतांवर केलीय...तर महाराष्ट्राची जनता राऊतांकडे करमणूक म्हणून बघते असा टोला केसरकरांनी लगावला.


पक्षाशी नमकहरामी करणा-यांना सोडू नका 


विधान परिषद निवडणुकीत मतं फुटल्यावरून जितेंद्र आव्हाड आक्रमक झालेयत. जे कुणी आमदार फुटले आहेत ते कळतीलच. मात्र, तुमच्या मतदारसंघातील असतील त्यांना जोड्याने मारा. पक्षाशी नमकहरामी करणा-यांना सोडू नका असं आवाहन आव्हाडांनी जनतेला केलंय. मतं फुटल्याने शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झालाय...त्यामुळे आव्हाडांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.


कालच्या विधान परिषद निवडणुकीत आमदारांचा भाव 20 ते 25 कोटी इतका होता...आमदारांना 2 एकर जमीन आणि पैशांचं वाटप केलं...ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती असा आरोप राऊतांनी केलाय...तर संजय राऊत हे फेक नरेटिव्हचे बादशहा आहे...अशी टीका शेलारांनी राऊतांवर केलीय...तर महाराष्ट्राची जनता राऊतांकडे करमणूक म्हणून बघते असा टोला केसरकरांनी लगावलाय...  तर मविआची 20 ते 22 मतं फुटल्याचा दावा मंत्री उदय सामंत यांनी केलाय. आरोप प्रत्यारोपांच्या या फैरींमुळे राज्याचं राजकारण पुन्हा एकदा तापल्याचं पाहायला मिळतंय.. मविआची मतं फुटल्यानं आघाडीमध्ये असलेला समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा अधोरेखीत झाला आहे.