Jayant Patil Vidhan Parishad Election:   विधान परिषदेत मविआचा तिसरा उमेदवार असलेले शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. जयंत पाटील यांच्या पराभवामुळे भाईंचा गेम कुणी केला याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झालीय.. राष्ट्रवादी शरद पवारांची मतं आणि काँग्रेसची अतिरिक्त मतं यावर जयंत पाटील यांची भिस्त होती.. मात्र त्यातही काहीशी गडबड झाल्याचं मत पराभवानंतर जयंत पाटील यांनी व्यक्त केलंय. विधान परिषदेच्या या निवडणुकीत कुणाला किती अधिकची मतं मिळाली आणि कुणाची मतं फुटल्याची याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. 


कुणाची मत कशी फुटली?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपला  एकूण 103 मते मिळाली.  मिळालेली मते 118. यात 15 मतांची तफावत आहे. याचा अर्थ भाजपला 15 जादा मते मिळाली.  राष्ट्रवादी अजित पवार गटाला  एकूण 42 मते मिळाली. मिळालेली मते  47 आहेत. तफावत पाहता 5 जादा मते मिळाली. शिवसेना शिंदे गटाला एकूण 38  मते मिळाली. मिळालेली मते  49 आहेत. तफावत 11 मतांची आहे. 11 जादा मते मिळाली आहेत.  शिवसेना उद्धव ठाकरे गटाला एकूण  17 मते मिळाली. मिळालेली मते - 22 आहेत.  तफावत 5 मतांची आहे.  जादा मते काँग्रेसची असण्याची शक्यता आहे.  काँग्रेसला एकूण 37 मते मिळाली.  सातव यांना 25 तर नार्वेकर यांना 5 मत जादा मिळाली.  तफावत 7 मतांची आहे.  नार्वेकरांना जरी 5 मतं काँग्रेसची गेली असं मानलं तरी यांची 7 मतं फुटल्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे  जयंत पाटलांना 12 मते मिळाली. 


 शरद पवारांनी जयंत पाटलांसाठी कसोशीने प्रयत्न केल्याचं संजय राऊत यांनी म्हटल आहे.  तर जितेंद्र आव्हाड यांनीही क्रॉस व्होटींग केलेल्या आमदारांचा समाचार घेतलाय. विधान परिषद निवडणुकीत मतं फुटल्यावरून जितेंद्र आव्हाड आक्रमक झालेत.  जितेंद्र आव्हाड यांनीही क्रॉस व्होटींग केलेल्या आमदारांचा समाचार घेतला.  तर महायुतीच्या नेते आशिष शेलार आणि सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेच्या या निवडणुकीवरून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय. 
विधान परिषद निवडणुकीत महायुतीची सरशी झाली. कारण महायुती भक्कम राहिली. तर महाविकास आघाडीमध्ये मात्र समन्वयाचा अभाव दिसून आला.. मतं फुटल्याने मविआमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय..