गोंदियात व्हिलेज टॅलेंट शोचं आयोजन
विविध स्थानिक कलावंताच्या प्रतिभेला वाव मिळावा यासाठी नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणा-या गोंदिया जिल्ह्यात प्रथमच व्हिलेज गॉट टेलेन्ट नावानं खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं.
गोंदिया : विविध स्थानिक कलावंताच्या प्रतिभेला वाव मिळावा यासाठी नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणा-या गोंदिया जिल्ह्यात प्रथमच व्हिलेज गॉट टेलेन्ट नावानं खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं.
विदर्भातल्या अनेकांनी यात सहभाग घेतला. या टॅलेंट शोच्या ग्रँड फिनाले कार्यक्रमाला सिने अभिनेत्री तेजसवींनी पंडित, जुनीयर जॉनी लिव्हर आणि इतरही कलाकार उपस्थित होते.
गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यामधल्या सावरटोला गावात हा दिमाखदार व्हिलेज टेलेन्ट शो आयोजित करण्यात आला होता. सावरटोला गावातलं खतरा नाट्यमंच मागील पाच वर्षांपासून अशाप्रकारे विविध स्पर्धांचं आयोजन करत आहे.