धुळे : अफवा आणि संशयाने पछाडलेल्या समाजाने आज विकृत आणि क्रूर रूप धारण केलं. धुळे जिल्ह्यात राईनपाडा इथे मुले चोरणारी टोळी असल्याच्या संशयावरून ५ जणांना बेदम मारहाण करून ठेचून मारण्यात आले. तर पोलिसांवरही दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे. या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण गाव फरार झाल्याचा प्रकारही समोर आलायं. सर्व गावकरी आपलं घर सोडून पसार झालेयत. पोलिसांनी या गावकऱ्यांचा शोध घेण्यास सुरूवात केलीय. या प्रकरणी पोलिसांनी ११ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय.


काय आहे प्रकरण ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राईनपाडा गावात मुलं चोरणारी टोळी असल्याचं समजून एका गाडीतून जाणाऱ्या ५ जणांना गाडीतून उतरवून ग्रामपंचायतीच्या खोलीत नेऊन ठेचून मारण्यात आलं. मृतांमध्ये दादाराव भोसले यांच्यासह पाचही जण सोलापूरचे आहेत.  मुलं चोरणारी टोळी पकडली गेली, अशी माहिती जसजशी पसरत गेली तशी गावातले अधिकाधीक लोक जमायला लागले. त्यानंतर प्रत्येकाने इथे येऊन पाच जणांना वाटेलतसं मारायला सुरूवात केली. या मारहाणीत पाचही जणांचा ठेचून मारण्यात आलं.  सुरूवातीला जे पोलीस गावात पोहोचले त्यांच्यावरही दगडफेक करण्यात आली. 


दहशतीचं वातावरणं 


पिंपळनेर पोलीस स्थानकापासून हे गाव चाळीस किलोमीटर आहे. या संपूर्ण परिसरात यामुळे तणाव पसरला असून गावागावात दहशतीचं वातावरण आहे. याआधीही दोन दिवसांपूर्वी शहादा तालुक्यात पंढरपूरच्या तिघांना मारहाण करून त्यांची गाडी जाळून टाकण्यात आली होती.