बीड : बीड -भाजप सेना महायुतीसोबत राज्यात सत्तेत असणारे शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी बीडमध्ये राष्ट्रवादीच्या पारड्यात आपली ताकद टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढणार असून भाजप आणि विशेषतः पंकजा मुंडे यांच्यासमोरील अडचणी वाढणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांचे राजकीय हाडवैर सर्वश्रुत आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणूक जाहीर होताच मेटे यांनी राज्यात महायुतीसोबत मात्र बीडमध्ये भाजप विरोधात अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मेटे यांना कानपिचक्या दिल्या होत्या. गेल्या पंधरा दिवसापासून मेटे आणि त्यांचे कार्यकर्ते शांत होते.


दरम्यान गुरुवारी बीड येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मेटे यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर टीकेची झोड उठवत लोकसभेत शिवसंग्राम च्या मावळ्यांनी राष्ट्रवादी ला साथ द्यावी आणि पंकजा मुंडे यांची मस्ती जिरवावी असा आदेश दिला आहे.