बीड : 3 राज्यातील भाजपाच्या पराभवानंतर सत्तेतील साथीदार शिवसेना आक्रमक झाली आहे. राफेल प्रकरण, नोटाबंदी, जीएसटी, महागाई अशा अनेक मुद्द्यांवर भाजपा सरकारला धारेवर धरले जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात फडणवीस सरकारला कर्जमाफी, आरक्षण अशा प्रश्नांसोबतच अंतर्गत वादांवरही मात करायची आहे. एकीकडे सत्तेत असलेली शिवसेना सरकार विरोधात आक्रमक झालेली असतांना आता भाजपचा मित्रपक्ष विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष बंडाचे निशाण फडकवण्याच्या तयारीत आहे.  मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चिन्हे नाहीत, तेव्हा मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळण्याची शक्यता नाही, असं कारण सांगत विनायक मेटे भाजपापासून विभक्त होण्याच्या मनःस्थितीत आहेत.


लवकरच निर्णय 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 रविवारी बीडमध्ये झालेल्या शिवसंग्रामच्या कार्यकारणी बैठकीत विनायक मेटे यांनी जिल्ह्यात भाजपाकडून सन्मानयोग्य वागणूक मिळत नसल्याचं कारण सांगत बीड जिल्हापरिषदमध्ये भाजपला दिलेला पाठींबा पक्षाने काढुन घेतला आहे. आता राज्यात भाजपला दिलेला पाठींबा काढण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.तेव्हा भाजप नाराज विनायक मेटे यांची समजूत काढतो का हे बघणं महत्त्वाचं ठरेल.