मुंबई :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज (12 सप्टेंबर) औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर आहेत.  संभाजीनगरच्या पैठणमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे. त्यांच्या याच दौऱ्याची जोरदार तयारी शिंदे गटाकडून सुरु असताना कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरेंच्या (Sandipanrao Bhumre) कार्यकर्त्यांची एक Audio Clip Viral झाली आहे. (viral phone recording of paying money to gather crowd at cm eknath shinde sabha sandeepan bhumare )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या Audio Clip मध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पैसे देऊन गर्दी जमवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच अडीचशे ते 300 रुपये देऊन महिलांना सभेसाठी आणण्याचे असे देखील ऑडिओ क्लीपमध्ये (Audio Clip) संभाषण आहे. ही ऑडिओ क्लीप (Audio Clip) कधीची आहे? आताची आहे की जुनी आहे? याची झी २४ तास पुष्टी करत नाही. मात्र मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी ही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.  


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची १२ तारखेला संभाजीनगर येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र, या सभेला प्रतिसाद मिळणार नाही हे माहीत असल्याने मंत्री संदीपान भुमरे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना कामाला लावले आहे. लोकांनी सभेला उपस्थित राहावे, म्हणून त्यांना पैसे दिले जात आहेत, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (ambadas danave) यांनी केला आहे. त्याचदरम्यान या सभेसाठी कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरेंच्या कार्यकर्त्यांची एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाला आहे. 


या ऑडिओमध्ये "आपण 400 रुपये पण दिले असते पण पैशाचा विषय त्यांच्या हातात आहे. भाऊ पैसे ते देणार की तुम्ही देणार..., नाहीतर तिथे गेल्यावर असं नाही झालं पाहिजे. पैसे कोण देणार? आपल्याकडे त्यांनी अडीच लाख रुपये पाठवले होते. बरं का...मी सचिनलाही म्हटलं भाऊ.. आपल्याकडे नको घेऊ पैसे... नाहीतर अर्धे खाल्ले आणि अर्धे दिले, अशा पध्दतीचा आरोप होतोय... तुम्ही पण करोडपती आहे त्यामुळे पैशाची चिंता नाही तसं..." असे संभाषण करण्यात आले.  हे संभाषण कुणाचे आहे ते अद्याप कळू शकलं नाहीये. पण, भुमरेंच्या मुलाचा उल्लेख ऑडिओ क्लीपमध्ये करण्यात आलाय. सभेला गर्दी जमा करण्यासाठीची ही बातचीत आहे. 



संदीपान भुमरें यांचे स्पष्टीकरण
यावर संदीपान भुमरें यांनी स्पष्टीकरण देताना म्हणाले की, आमचा कोणताही कार्यकर्ता यामध्ये सहभागी नाही. मुख्यमंत्र्यांची सभा होते म्हणून विरोधकांची ही सर्व नाटक सुरू आहेत. पैसे देण्याची आम्हाला गरज नाही. ठाकरे किंवा राष्ट्रवादी गटातून ही ऑडिओ क्लीप करण्यात आली असावी. मुख्यमंत्र्यांची सभा झाल्यानंतर आम्ही शोध घेऊन कारवाई करू, अशी माहिती भुमरें यांनी झी 24 तास दिली आहे.