Nashik’s Trimbakeshwar Temple: नाशिक शहरातील रामकुंड (Nashik, Ramkunda) म्हणजे भाविकांचे श्रद्धास्थान. मात्र, गोदावरी नदीत (Godavari River) असलेल्या रामकुंड परिसरात श्रद्धेचा बाजार सुरू असल्याचं समोर आल्यानंतर आणखी एक धक्कादायक प्रकाराचा भंडाफोड झाला आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी अतिप्राचीन मंदिर म्हणून ओळख असलेलं  त्र्यंबकेश्वर मंदिर (Nashik Trimbakeshwer Temple) जिल्ह्यातच नव्हे तर देशभरात प्रसिद्ध आहे. येथे दररोज हजारो भाविकांची रेलचेल असते. परंतु, त्र्यंबकेश्वराच्या गर्भगृहातील शिवपिंडात बाबा अमरनाथप्रमाणे बर्फ तयार झाल्याचा व्हिडिओ गेल्या वर्षी समोर आला होता.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्र्यंबकेश्वराच्या गर्भगृहातील शिवपिंडावर बर्फ कसा तयार झाला याची आता माहिती समोर आली आहे. पिंडीत बर्फ साचल्याने बाबा अमरनाथ (Baba Amarnath) प्रकट झाल्याचा दावा साफ खोटा असल्याचं तपासात समोर आलं आहे. मंदिरातील पुजाऱ्यानेच दोन सहकाऱ्यांच्या मदतीने पिशवीत बर्फ नेऊन तो पिंडीवर ठेवल्याचं निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी तत्कालीन प्रशासकीय अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मंदिरातील एका पुरोहितासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसर, संत निवृत्तीनाथ मंदिर, कुशावर्त तीर्थ, ब्रह्मगिरी आदी पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी असते. यातील अनेक भाविक या ठिकाणी पूजाविधी करण्यासाठी येत असतात. दरम्यान हे मंदिर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते पुन्हा हे मंदिर चर्चेत आले. कारण मंदिरातील मुख्य पिंडीवर बर्फ जमा झाल्याचे समजताच भाविकांनी हा चमत्कार पाहण्यासाठी मंदिरात गर्दी केली. मात्र नाशिक पोलिसांनी त्र्यंबकेश्वरच्या पिंडीवरील चमत्कारिक बर्फ हा खरा की खोटा याचा धक्कादायक खुलासा केला आहे. 


नाशिक जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक वारसा असलेले मंदिरे आहेत. अंजनेरी येथील मंदिर, त्र्यंबकेश्वर येथील शंकराचे प्राचीन मंदिर, गोदाघाट, काळाराम, गोराराम यासारख्या मंदिराचा खास वारसा येथे लाभलेला आहे. त्यातच त्र्यंबकेश्वर येथील शंकराचे प्राचीन मंदिर (Trimbakeshwar Mandir Nashik) येथे पिंडीवर बर्फ जमा झाल्याचे सांगण्यात येत होतं.


वाचा: मुख्यमंत्री  शिंदेंच्या वाढदिवसाला ठाणेकरांना मोठं गिफ्ट 


काय आहे प्रकरण?


त्र्यंबकेश्वराच्या गर्भगृहातील शिवपिंडीत बाबा अमरनाथप्रमाणे बर्फ तयार झाल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांत व्हायरल झाला होता. 30 जून 2022 रोजी समाजमाध्यमांत प्रसारित झालेल्या या व्हिडिओबाबत पोलिस तपासात केला असता, या तपासामध्ये पोलिसांना एका पुजाऱ्यानेच दोन सहकाऱ्यांच्या मदतीने पिशवीत बर्फ नेऊन तो पिंडीवर ठेवल्याच निष्पन्न झालंय. तत्कालीन प्रशासकीय अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पुरोहितासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.



धक्कादायक प्रकार समोर...


देवस्थान ट्रस्ट प्रशासनाने सत्यता पडताळून पाहतांना नेमलेल्या चौकशी समितीने त्र्यंबकेश्वर मंदिरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आलाये.त्र्यंबकेश्वर देवस्थानाबाबत खोटा प्रचार केला म्हणून सुशांत तुंगार आणि त्याला मदत करणारे आकाश तुंगार आणि उल्हास तुंगार यांच्यावर भादंवि कलम 505(3), 417 आणि 120 (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणानंतर चर्चांना ऊत आला होता.