VIDEO VIRAL : `साहेब will not listen...`, म्हणत अधिकाऱ्यासमोर शेतकऱ्यानं वाचला अडचणींचा पाढा
VIDEO VIRAL : शेतात अचानकच आलं वीज चोरी रोखणारं पथक, अधिकऱ्यांपुढे मग धीरानं उभं राहून आजोबांनी फाडफाड इंग्रजीतूनच वाचला अडचणींचा पाढा. आता पुढं काय?
Trending Video : सोशल मीडियावर (Social Media) दर दिवसाला नव्हे तर जर मिनिटाला असंख्य गोष्टी व्हायरल असतात. मग यामध्ये व्हिडीओ असो कंवा मग फोटो. एखाद्या विषयाला चालना मिळून त्याचा ट्रेंडही या सोशल मीडियावर पाहायला मिळतो. याच (Trends) ट्रेंड्सच्या गर्दीमध्ये सध्या एक अशी घटना समोर आली आहे, जिथं एक शेतकरी (Farmer Video) अधिकाऱ्यापुढे चक्क इंग्रजीतून आपल्या अडचणींचा पाढा वाचताना दिसत आहे. वयोवृद्ध शेतकऱ्यानं आपल्यापुढं असणाऱ्या अधिकाऱ्या ज्या पोटतिडकीनं आपल्या अडचणी सांगितल्या ते पाहून अधिकारीसुद्धा ऐकतच राहिला हेच या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
आजोबांची कमालच...
प्राथमिक माहितीनुसार हा व्हिडीओ सांगलीतील (Sangli) आटपाडी तालुक्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे. जिथं सध्या महावितरणच्या वतीनं वीजचोरी (Electricity) अटोक्यात आणण्यासाठी आणि पूर्णपणे रोखण्यासाठी काही पावलं उचलली जात आहेत. अशाच एका पथकानं वाडी गाव गाठलं. तिथं गेलं असता एका वयोवृद्ध शेतकऱ्यानं शेतातील पंपासाठी वीजचोरी केल्याची बाब समोर आली. ज्यानंतर पुढे जे घडलं ते सध्या संपूर्ण महाराष्ट्रच पाहत आहे.
'साहेब विल नॉट लिसन'
अधिकारी आपल्यासमोर सदरील प्रकरणाचा जाब विचारतना पाहून या आजोबांनी एक शेतकरी म्हणून आपण नेमकं कोणकोणत्या अडचणींचा सामना करतो याची यादीच सर्वांसमोर ठेवली. बरं, यावेळी ते इंग्रजीतून संवाद साधत अधिकाऱ्यापुढं आपली बाजू मांडत होते. अधिकारीसुद्धा लक्षपूर्वक त्यांचं म्हणणं ऐकून नेमकं त्यांनी असं का केलं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते.
हेसुद्धा वाचा : रत्नागिरीत पत्रकाराच्या अपघाती मृत्यूमुळे खळबळ, ज्याच्या विरोधात बातमी लावली त्याच्याच गाडीने दिली धडक, संशय बळावला
'साहेब विल नॉट लिसन' म्हणणाऱ्या आजोबांनी इंग्रजीतून संवाद साधताना मध्येमध्ये मराठी शब्दांचाही वापर केला. जे पाहताना काहींना हसूही येत आहे. पण, ते ज्या आग्रही सुरात अधिकाऱ्यापुढं व्यथा मांडत होते ते पाहता या शेतकऱ्यांपुढे असणाऱ्या अडचणींचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला.