कधी पाहिलंय लग्नाचं असं हटके प्रपोज? तरुणानं हवेत घातली लग्नाची मागणी
आयुष्यातला हा महत्त्वाचा क्षण दोघांसाठीही अविस्मरणीय आहे.
श्रीकांत राऊत, यवतमाळ : सोशल मीडियाच्या जगात कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. तसेच प्रसिद्धी मिळवण्याठी देखील लोकं काही प्रयोग करतात. ज्यामुळे रातोरात त्यांचीच चर्चा होईल. सध्या अशीच एक जोडी सर्वत्र चर्चेत आहेत. ज्यामध्ये प्रियकराने आपल्या प्रेयसीला लग्नाची मागणी घालण्यासाठी हटके प्रयत्न केला. यामुळे हे जोडपं सध्या चर्चत आहे. या जोडप्याची मुलाखत झी 24 तासने घेतली आहे आणि त्यांची भावाना या दोन्ही तरुण-तरुणींनी व्यक्त केली आहे.
या तरुणाचं नाव आहे सिद्धार्थ तायडे. सिद्धार्थ हा यवतमाळमधील दिग्रसला राहातो. त्याचं स्नेहावर प्रेम आहे आणि त्याला तिला लग्नासाठी मागणी देखील घालायची होती. परंतु त्याला स्नेहाला हटके पद्धतीनं मागणी घालायची होती, ज्यासाठी त्याने स्नाहाच्या डोळ्याला पट्टी बांधली.
सिद्धार्थनं स्नेहाला आणलं मुंबईतल्या जुहूच्या हेलिपॅडवर. तिच्यासाठी अर्थातच हे सरप्राईज होतं. मात्र त्यापेक्षा मोठं सरप्राईज होतं ते हेलिकॉप्टरनं हवेत झेप घेतल्यावर. हेलिकॉप्टर हवेत शेकडो फूट उंचावर गेल्यानंतर सिद्धार्थनं स्नेहाला लग्नाची मागणी घातली आणि भारावलेल्या स्नेहानं त्याला होकार देखील दिला.
सिद्धार्थचं स्नेहावर मनापासून प्रेम आहे. आयुष्यातला हा महत्त्वाचा क्षण दोघांसाठीही अविस्मरणीय असावा, अशी त्याची इच्छा होती. मग त्यानं कपडे घेण्याचं निमित्त करून स्नेहाला मुंबईत आणलं आणि असं भन्नाट स्टाईलमध्ये सरप्राईजिंग प्रपोज केलं.
प्रेमात वाट्टेल ती हौस भागवण्याची तयारी प्रमवीरांची असते. सिद्धार्थ आणि स्नेहादेखील त्याला अपवाद नाहीत हेच त्यांच्या गगनभरारीवरूनच दिसतंय.