अशी विचित्र वरात तुम्ही आतापर्यंत कधीच पाहिली नसेल, व्हिडीओ बघाच!
एका नवविवाहित जोडप्याने आपल्या लग्नाची वरात अनोख्या पद्धतीने काढली.
कोल्हापूर - कमी वेळेत जास्त प्रसिद्धीसाठी सोशय मीडिया हे सर्वात उत्तम प्लॅटफॉर्म आहे. सोशल मीडियावरुन लोकं अनेक समस्यांकडेही लोकांचे आणि प्रशासनाचे लक्ष वेधणाचे प्रयत्न करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ चर्चेचा विषय बनला आहे.
एका नवविवाहित जोडप्याने आपल्या लग्नाची वरात अनोख्या पद्धतीने काढली. हा व्हिडीओ कोल्हापुरातील आहे. या जोडप्याचं सर्व स्तरावर कौतुक होतं आहे. तर हा व्हिडीओही मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
अनोखी वरात
लग्न म्हटलं की वरात आलीच. आजकाल वेगवेगळ्या अनोख्या आयडिया शोधणं लग्नाची वरात काढण्याचा जणू काही ट्रेंडच आला आहे, असं म्हणायला हरकत नाही. काही दिवसांपूर्वीच आपण पावसाळ्यात ताडपत्री वरात पाहिली होती. सोशल मीडियावर अशीच एक हटके वरातीचा व्हिडीओ गाजतोय. पण ही वरात प्रसिद्धीसाठी नसून प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी काढण्यात आली आहे.
महाराष्ट्रात उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईची समस्या अनेक भागात लोकांना सहन करावी लागते. कोल्हापुरातही पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे या जोडप्याने प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी चक्क पाण्याच्या टँकरवरुन आपली वरात काढली.
इतकंच नाही तर पाण्याचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत त्यांनी हनीमूनला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा व्हिडीओने सोशल मीडियावर या जोडप्याचं कौतुक होतं आहे. तर काही युजर्सने त्यांना लग्नाचा शुभेच्छा दिल्या आहेत. तर काही यूजर्सने त्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल धन्यवाद म्हटलं आहे.
महत्त्वपूर्ण आणि समाजहिताचा संदेश
पाणी अनेक भागात गंभीर समस्या आहे. दोन दोन दिवस पाणी येत नसल्याने लोकांनी प्रशासनाकडे दाद मागितली मात्र या प्रश्नाचं निरासन होत नाही. 47 सेकंदच्या या व्हिडीओने प्रशासनला जाग येईल अशी आपण अपेक्षा करु. तसंच कायम पाणी जपून वापरा.