मयुर निकम, झी मीडिया, बुलढाणा : इंटरनेटच्या या युगात कोण कुठे आणि कधी व्हायरल होईल याचा नेमच नाही . जगभरात दररोज काही न काही गमतीजमती घडतात आणि अशीच एक गंम्मत बुलढाणा जिल्ह्यातील कळमेश्वर गावात घडलीय. त्याच झालं असं की शंकर आणि कार्तिक नावाचे मित्र खेळता खेळता अचानक भांडायला लागले...भांडता भांडता त्यांनी एकमेकांना नावावरून चीड पाडली... त्यातील कार्तिकने शंकरला अय शंकरपाळ्या म्हणून चिडवलं...वऱ्हाडी भाषेत त्याला खिजवलं म्हणतात....आणि मग काय शंकरने फिल्मी स्टाईलमध्ये त्याला दम दिला आणि उपस्थित असलेल्या कुणीतरी तो व्हिडीओ कडून व्हायरल केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहता पाहता हा व्हिडिओ संबंध महाराष्ट्रात व्हायरल झाला. मिम्स बनले...फेसबुकवर जोक्स बनले आणि बरंच काही तुफान या व्हिडीओमुळे घडलं..



याबाबत शेजारच्यांना विचारणा केली असता शंकर अगदी खोडकर मुलगा आहे. रोज कोणत्या न कोणत्या कारणास्तव तो भांडण आणतोच आणि हे भांडण तर अतिशय गमतीशीर झाल् तसेच प्रत्येकजण या दोघांच कौतुक करतोय...असं शेजारचे शिवानंद गायकवाड सांगतात.


भांडण का झालं असं शंकर आणि कार्तिकला विचारल्यावर 'हे भांडण आता मिटवायच' असे उत्तर दोघांनी दिलं. 'झी २४ तास'च्या प्रतिनिधीसमोर हे भांडण मिटल्याचं दोघांनी मान्य केलंय. आणि एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून दोघेही निघून गेलेयत. नेहमीच्या धक्काधक्कीच्या जिवनात या दोघांनी हास्याचे क्षण दिले एवढं मात्र खरंय..