नणंदेचा गर्भपात घडवण्यासाठी रचला अघोरी कट; विरारच्या भगताला पैसेदेखील दिले पण...
Mumbai Crime News: कौटुंबिक वादात नणंदेचा गर्भपात घडवून आणण्यासाठी जादूटोणा करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. विरारच्या मांडवी पोलीस ठाणे हद्दीतील धक्कादायक प्रकार आरोपी महिला व भगतावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रथमेश तावडे, झी मीडिया
Mumbai Crime News: महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असल्याचे सातत्याने सांगितलं जातं. मात्र गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात घडणाऱ्या घटनांमुळं खरंच महाराष्ट्र पुन्हा विचलित होत आहे. विरारमध्ये (Virar) एक भयानक प्रकार घडला. कौटुंबिक वादातून नणंदेचा गर्भपात घडवून आणण्याचा प्रयत्न तिच्याच भावजयीने केला आहे. पण यासाठी तिने अघोरी पद्धत आवलंबल्याने एकच खळबळ उडाली आहे. नणंदेचा गर्भपात घडवून आणण्यासाठी आरोपी महिलेने जादूटोण्याचा आधार घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मांडवी पोलिस ठाणे हद्दीत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी आरोपी महिला आणि भगताला ताब्यात घेतलं आहे. तर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. (Virar Crime News)
कौटुंबिक वादातून नणंदेचा गर्भपात घडवून आणण्यासाठी अघोरी कृत्य व जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार विरार जवळच्या मांडवी पोलीस ठाणे हद्दीत घडला आहे. या प्रकरणी पतीनेचं आपल्या पत्नी व भगता विरोधात मांडवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळं कुटुंबीयांना एकच धक्का बसला आहे.
वैयक्तिक आकसापोटी रचला डाव
विरार येथील एका गावात राहणाऱ्या सदर आरोपी महिलेचे घरात पतीच्या बहिणीसोबत म्हणजेचं नणंदेसोबत कौटुंबिक भांडण सुरू होते. गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. त्यातच नणंद गर्भवती असल्याचे समजल्यानंतर वैयक्तिक आकसापोटी तिने भयंकर कट रचला. घराजवळच्या जादूटोणा व अघोरी विद्या करणाऱ्या भगताला नणंदेचा गर्भपात करायला सांगितला व त्यासाठीचे पैसे तिने भगताला ऑनलाइन ट्रान्सफर केले होते.
पतीनेच बायकोचे सत्य पकडले
आरोपी पत्नीच्या पतीला हा संपूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने तिच्या मोबाईलमधले कॉल रेकॉर्डिंग ऐकले व त्या आधारे मांडवी पोलिसात जाऊन आरोपी पत्नी विरोधात तक्रार दाखल केली आहे. मांडवी पोलिसांनी ही ऑडिओ क्लिप एकूण त्या आधारे आरोपी महिलेवर महाराष्ट्र नरबळी व जादूटोणा प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास केला जात आहे.
स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराजाला अटक
दर्शनासाठी आलेल्या भक्त महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ महाराज लोमटे याला येरमाळा पोलिसांना अटक केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी सापळा रुचून लोमटे महाराजाला पंढरपूर मधून अटक केली आहे. कळंब न्यायालयाने लोमटे महाराज याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेमुळे अध्यात्मिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे