विरार : विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयात (Vijay Vallabh Hospital) काल मध्यरात्रीच्या सुमारास आयसीयु वॉर्डमध्ये भीषण आग लागली. या आगीत 13 जणांचा  होरपळून मृत्यू  झालाय. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजय वल्लभ रुग्णालयात रात्री 3 च्या सुमारास आगीचं तांडव पाहायला मिळालं. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून इतर रुग्णांना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात आलंय. या संपूर्ण घटनेमुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आयसीयूमध्ये एकूण 17 जण होते. त्यातील 13 जणांचा मृत्यू झालाय.



दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल अशी प्रतिक्रिया पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी झी 24 तासशी बोलताना दिली आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, या घटनेची सखोल चौकशी करावी अशी मागणी आमदार हितेंद्र ठाकुर (MLA Hitendra Thakur) यांनी केली आहे.


या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने वसई विरार महापालिकेचं अग्निशमन दल तातडीनं घटनास्थळी पोहोचलं. रुग्णालयाचं फायर ऑडीट करा अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलीय. दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या (Bjp Leader Kiriet Somayya) यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपेंच्या (Health Minister Rajesh Tope) राजीनाम्याची मागणी केली आहे. प्रशासनाच्या निष्काळजी पणामुळे 13 जणांचा नाहक बळी गेल्याची प्रतिक्रिया भाजप आमदार राम कदम (Bjp MLA Ram Kadam) यांनी केलीय.