मतदानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकणे असं महागात पडलं
मतदारांनी गोपनीयतेचा भंग केला आणि मतदान करतानाचे व्हिडीओ सोशल
बुलढाणा : मतदान करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणं, बुलढाण्यातील काही मतदारांना महागात पडलं आहे. व्हिडिओ व्हायरल केल्याने गोपनियतेचा भंग झाला असून, या मतदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
मतदान केंद्रांमध्ये मोबाईलला बंदी असतानाही या मतदारांनी गोपनीयतेचा भंग केला आणि मतदान करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले.
ईव्हीएम मशीन तसेच उमेदवारांची सूची या व्हिडिओमध्ये दिसतेय, तसचं मतदान कोणाला केले हेही त्यातून ठळकपणे लक्षात येतंय. पोलीस अधीक्षकांनी यावर तात्काळ कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे.