भाजपला मोठा झटका, शिवसेनेकडून मंत्र्यांच्या मुलीचा पराभव
ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नव्या झालेल्या पालघर जिल्ह्यातील वाडा नगर पंचायतीमध्ये भाजपला मोठा झटका बसलाय.
पालघर : ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नव्या झालेल्या पालघर जिल्ह्यातील वाडा नगर पंचायतीमध्ये भाजपला मोठा झटका बसलाय. आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांच्या कन्येला या निवडणुकीत शिवसेनेकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे.
वाडा नगरपंचयातीमध्ये मंत्री विष्णू सावरा यांच्या कन्या निशा सवरा यांचा पराभव झालाय. नगराध्यक्ष पदी शिवसेनेच्या गीतांजली कोलेकर विजयी झाल्या आहेत.
वाड्यातील नगरपंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला असून सेनेच्या गीतांजली कोलेकर या नगराध्यक्ष पदासाठी विजयी झाल्या असून भाजपा च्या निशा सवरा यांचा त्यांनी पराभव केला आहे. निशा सवरा या आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या कन्या असून सवराना रोखण्यात शिवसेनेला यश आले आहे.
या निवडणुकीत शिवसेनेला ६ तर भाजपा ६ अशा समसमान जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस २, बहुजन विकास आघाडी २ तर राष्ट्रवादी १ असे पक्षीय बलाबल आहे. या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना मतदारांनी पूर्णपणे नाकारले आहे.