मिलिंद आंडे, झी २४ तास, वर्धा :  वर्ध्याच्या कुटकी तळोदी येथील अल्पवयीन शाळकरी मुलगा ट्युशनला जात होता. ट्युशनला जात असताना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने चाकूचा धाक दाखवून त्याला लुटण्यात आलं. ही घटना 25 मे रोजी घडली असून मात्र 31 मी रोजी उजेडात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोपी हे सेवाग्राम कडुन एका पांढऱ्या रंगाच्या मोपेड गाडीवरून तीन इसम आले. त्यांनी नागपूरकडे जाण्याचा रस्ता विचारला. यानंतर त्यांनी थेट चाकू काढला. चाकूच्या धाकावर त्यांनी शाळकरी मुलाजवळून  रिअलमी कंपनीचा मोबाईल, नगद 500 रुपये हिसकावून नेले. 


पोलिसांत गुन्हा दाखल होताच सेवाग्राम पोलीस आणि सायबर सेलच्या मदतीने अंशुल विजय ढाले (वय 22 वर्ष), प्रतिक दिपक चारभे (वय 20 वर्ष), यांना नागपूरमधून अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरलेले नगदी 500 रुपये आणि रिअलमी कंपनीचा मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली पांढरी मोपेड जप्त करण्यात आली. 


wardha boy robbed by three unknown men while going for tuition