वर्ध्याहून निघालेल्या नागरिक मोर्चाचे नागपूरच्या संविधान चौकात ठाण
गेल्या अनेक वर्षांपासून ज्या जागी राहत आहोत त्या जागेचे जमिनीचे पट्टे स्वत:च्या नावावर करण्याची मागणी करत वर्ध्याहून निघालेला नागरिकांचा मोर्चा नागपुरात पोहोचला.
नागपूर : गेल्या अनेक वर्षांपासून ज्या जागी राहत आहोत त्या जागेचे जमिनीचे पट्टे स्वत:च्या नावावर करण्याची मागणी करत वर्ध्याहून निघालेला नागरिकांचा मोर्चा नागपुरात पोहोचला.
सोयी-सुविधांपासून वंचित
गेल्या २५-३० वर्षांपासून अनेक नागरिक एकाच जागेवर राहताहेत. त्या अतिक्रमणधारक म्हणून ओळखण्यात येतं. निवडणुकीच्या तोंडावर या अतिक्रमणधारी नागरिकांना जमिनीचे पट्टे त्यांच्या नावावर करण्याचे गाजर दाखवण्यात येतं. मात्र जमिनीचे पट्टे काही त्यांच्या नावावर झाले नाहीत. त्यामुळे ते अनेक सोयी-सुविधांपासून वंचित आहेत.
घरकुलांचाही लाभ नाही
तसेच घरकुलांचाही लाभ मिळाला नसल्याचे या मोर्चेकरांनी सांगितलं. नागपूरच्या संविधान चौकात मोर्चेकऱ्यांनी ठाण मांडलं असून सरकारकडून लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचं मोर्चेकरी आणि नेत्यांनी सांगितलं.