वर्धा : वर्धातल्या आर्वी तालुक्यात एक हादरवणारी घटना समोर आली आहे. आर्वी तालुक्यात एका साठ वर्षांच्या वृद्धाला जिवंत जाळण्यात आलं. यात या वृद्धाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर्वी तालुक्यातल्या रामपूर इथली ही घटना असून मृत व्यक्तीचं नाव अभिमान असं आहे. अभिमान याला दारु पिण्याचं व्यसन होतं. सोमवारी अभिमान दारु घेण्यासाठी गावातील एका दारु विक्रेत्याकडे गेला होता. याठिकाणी काहीजणांबरोबर अभिमान  यांचा वाद झाला. अवघ्या 50 रुपयांवरुन हा वाद पेटला आणि याचं पर्यावसन मारहाणीत झालं. 


हा वाद इतका टोकाला गेला की संतापलेल्या आरोपींनी अभिमानला जिंवत जाळलं. यातच होरपळून अभिमान यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी आर्वी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.


याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरु आहे.